सारा आली खान ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक आहे. सारा अभिनयासोबतच तिच्या बोल्ड लूकसाठी ओळखली जाते. ती सोशल मीडियावर सक्रिय असते आणि तिच्या बोल्ड आनंदजतील अनेक फोटो पोस्ट करत असते. सारा काही दिवसांपूर्वी मालदिव मध्ये सुट्टी एजॉय करत होती. ती मुंबईत परत आली असली तरी तिच्या या सुट्टी दरम्यानच्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरु आहे.

साराने तिच्या इन्स्टाग्रामवर बिकिनीतील चार फोटो शेअर केले आहेत. या चार फोटोत सारा समुद्र किनारी वेगवेगळ्या अंदाजात पोझ देताना दिसत आहे. एका फोटोत ती झोपाळ्यावर बसलेली दिसली, दुसऱ्या फोटोत दोन हाताने हार्टचे चिन्ह बनवत पोझ देत आहे, तिसऱ्या फोटोत नारळाच्या झाडावर पोझ दिली आहे. तर शेवटच्या फोटोत बोटीवर बसून योगाची पोझ देत सूर्यास्त पाहत आहे. हे फोटो शेअर करत तिने छान कॅप्शन दिलं आहे.

साराने शेअर केलेल्या फोटोवर नेटकरी फिदा झाले आहेत. हे शेअर करताच लाखोच्या प्रमाणात लाइक्स मिळता आहेत. फोटोवर कमेंट करत नेटकरी त्यांच्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. दरम्यान, साराने गणपती उत्सव साजरा करतानाचे फोटो देखील शेअर केले आहेत. या फोटोत तिने पांढऱ्या रंगाचा आणि तिची आई अमृताने निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे.

वर्क फ्रंट बद्दल बोलायचे झाले तर सारा दिग्दर्शक आनंद एल राय यांच्या ‘अतरंगी रे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अक्षय कुमार आणि धनुषही आहे. याशिवाय सारा ‘द इम्मोर्टल अश्वत्थामा’ या चित्रपटात ती दिसणार आहे. या चित्रपटात सारा विकी कौशलसोबत दिसणार आहे. तर या चित्रपटाचे दिग्दर्शन हे आदित्य धर करणार आहेत. या आधी सारा ‘कुली नंबर १’ या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटात ती वरुण धवनसोबत दिसली होती. तर हा चित्रपट अॅमेझॉन प्राइम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला होता.