15 July 2020

News Flash

वजनदार सारा फिट कशी झाली?; पाहा व्हिडीओ

सारा अली खानने सांगितली तिची वेट लॉस जर्नी

सारा अली खान बॉलिवूडमधील अत्यंत फिट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. तिच्या फिटनेसची चाहत्यांमध्ये चर्चा असते. परंतु सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सारा आजच्या इतकी फिट नव्हती. किंबहूना ती बरीच स्थूल होती. मात्र तिने मेहनत, वर्कआऊट, योग्य आहार घेऊन स्थूलतेवर मात केली. साराने आपल्या फॅट टू फिट या प्रवासाचा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे.

 

View this post on Instagram

 

Episode 2: From Sara ka Sara to Sara ka aadha

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95) on

साराने पोस्ट केलेल्या या व्हिडीओमध्ये सुरुवातीला तिचा स्थूल अवतार दिसत आहे. त्यावेळी तिचं वजन ९६ किलो इतकं होतं. त्यानंतर व्यायाम करुन ती कशी फिट झाली? हा प्रवास दाखवण्यात आला आहे. तिने आपलं वर्कआऊट शेड्युल्ड चाहत्यांना सांगितलं आहे. ती विविध प्रकारचे व्यायाम करताना दिसत आहे. या व्हिडीओच्या माध्यमातून तिने चाहत्यांना व्यायाम करण्यासाठी प्रेरणा दिली आहे.

सारा अली खानचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेकांनी साराने घेतलेल्या या मेहनतीचे प्रचंड कौतुक केलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 1, 2020 12:26 pm

Web Title: sara ali khan shares her weight loss journey mppg 94
Next Stories
1 …तर आज आर. माधवन अभिनेता नसता
2 सनीने सांगितला इंटिमेट सीन शूटचा अनुभव; ‘त्यावेळी अनेकजण ….’
3 लॉकडाउनमध्ये पतीसोबत अजून राहू शकत नाही म्हणणाऱ्या महिलेला सोनू सूदचं भन्नाट उत्तर
Just Now!
X