News Flash

हा आहे साराचा ‘विटामिन-सी’डोस, शेअर केले हॉट फोटो

मजेशीर कॅप्शनवर चाहते फिदा

अभिनेत्री सारा अली खानने तिच्या अभिनय कौशल्याने चाहत्यांची मनं जिकली आहेत. सोशल मीडियावर देखील सारा चांगलीच अ‍ॅक्टीव असते. अनेक हॉट फोटो तसंच व्हिडीओ ती शेअर करत असते. सारा अली खानला बऱ्याचदा एअर पोर्ट किंवा तिच्या जिमच्या बाहेर स्पॉट केलं जात. मीडियाशी कायम आदराने बोलणं आणि गमती जमती करणं असा साराचा स्वभाव आहे. त्यामुळेच अनेक फोटोग्राफर्सची ती फेव्हरेट आहे.

सोशल मीडियावर देखील सारा बऱ्याचदा तिच्या फोटोला मजेशीर कॅप्शन देऊन चाहत्यांचं लक्ष वेधून घेत असते. नुकतेच साराने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत. साराच्या या हॉट फोटोंची सोशल मीडियावर सध्या जोरदार चर्चा रंगतेय.

समुद्र किनाऱ्यावरचे हॉट फोटो साराने शेअर केले आहेत. यातील एका फोटोत निळ्याशार समुद्रासमोर सारा ऑरेंज बिकनी घालून उभी असल्याचं दिसतंय. तर दुसऱ्या फोटोत ती निवांत बसली. साराच्या गळ्यात एक सुंदर कवड्याचं नेकपीस आहे. या फोटोला साराने एक मजेशीर कॅप्शन दिलंय. “तुमच्या विटामिन- सी चा डेली डोस” त्याच सोबत #vitaminc आणि #vitaminsea हे हॅशटॅग तिने या फोटोला दिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

साराच्या या हॉट फोटांना तिच्या चाहत्यांनी भरभरून लाईकस् दिले आहेत. काही तासातच साराच्या या फोटोंना 15 लाखांहून अधिक लाईकस् मिळाले आहेत. वर्षाच्या सुरूवातीलाच सारा अली खान तिच्या कुटुंबासोबत मालदिवला सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गेली होती. यावेळी देखील तिने अनेक फोटो चाहत्यांसोबत शेअर केले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

सारा अली खान तिच्या फॅशनमुळे कायम चर्चेत असते. वेगवेगळ्या लूकमधली तिचे फोटो सोशल मीडिआवर व्हायरल होत असतात. अलिकडे सारा अली खान ‘अतरंगी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमात सारासोबत अक्षय कुमार आणि धनुष मुख्य भूमिकेत झळकतील.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 4, 2021 10:15 am

Web Title: sara ali khan shares hot photo in orange bikini kpw 89
Next Stories
1 कुस्तीच्या आखाड्यात आकाशचा ‘ले पंगा’, पैलवान मित्रांचे मानले आभार
2 दामले यांची गोष्ट ‘चारशे’च्या उंबरठय़ावर
3 अजय देवगणच्या गाडीची अडवणूक, एकाला अटक
Just Now!
X