08 April 2020

News Flash

‘या’ कारणामुळे सारा-कार्तिक हॉस्पिटलमध्ये!

अनेकदा या दोघांना एकत्र पाहायला मिळतं

सारा अली खान, कार्तिक आर्यन

बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत राहणारी जोडी म्हणजे अभिनेता कार्तिक आर्यन आणि सारा अली खान. या जोडीने आजपर्यंत जाहीर कबुली दिली नसली तरी अनेकदा हे दोघं एकत्र दिसतात. त्यामुळे त्यांची सोशल मीडियावर कायम चर्चा रंगत असते. त्यातच आता या दोघांना पुन्हा एकद स्पॉट करण्यात आलं आहे. सारा आणि कार्तिक मुंबईमध्ये एका हॉस्पिटल बाहेर एकत्र दिसून आले आहेत. त्यांचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

सारा आणि कार्तिकला एका हॉस्पिटलबाहेर एकत्र पाहिल्यानंतर चाहत्यांमध्ये अनेक चर्चांना उधाण आलं आहे. मात्र गेल्या काही दिवसापासून कार्तिकचे वडील आजारी असल्यामुळे त्यांना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करण्यात आलं असून त्यांना भेटण्यासाठी सारा कार्तिकसोबत हॉस्पिटलमध्ये गेली होती. परंतु कार्तिकच्या वडिलांना नक्की काय झालं आहे, हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही.

वाचा : पुस्तकाच्या सहाय्याने तयार केले ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चे ४२ सेट

दरम्यान, सारा आणि कार्तिक लवकरच इम्तियाज अली यांच्या ‘लव्ह आज कल 2’ मध्ये दिसणार आहेत. नुकतंच या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं असून या चित्रपटाच्या सेटवर या दोघांमधील जवळीकता वाढल्याचं पाहायला मिळालं. त्यातच काही दिवसांपूर्वी साराच्या वाढदिवसाला कार्तिक तिला भेटण्यासाठी बँकॉकला पोहोचला होता. सारा सध्या बँकॉकमध्ये तिच्या आगामी ‘कुली नंबर 1’ या चित्रपटाचं चित्रीकरण करत आहे. तर सारा आणि कार्तिक यांचा ‘लव्ह आज कल 2’ पुढच्या वर्षी व्हॅलेंटाइन डेच्या मुहूर्तावर रिलीज होणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2019 6:08 pm

Web Title: sara ali khan spotted outside a hospital in mumbai along with kartik aaryan ssj 93
Next Stories
1 या पाच अभिनेत्रींनी धुडकावली होती ‘कुछ कुछ होता है’ची ऑफर
2 अनुष्काच्या घरी आली छोटी पाहुणी
3 पुस्तकाच्या सहाय्याने तयार केले ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चे ४२ सेट
Just Now!
X