News Flash

Confirmed : इम्तियाज अलीच्या चित्रपटात सारा-कार्तिकची जोडी

हा चित्रपट 'लव्ह आज कल'चा सिक्वल असल्याचं म्हटलं जात आहे.

सारा अली खान, कार्तिक आर्यन

सैफ अली खानची मुलगी, अभिनेत्री सारा अली खानने नुकतंच बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पदार्पणाच्या आधीपासूनच ती चर्चेत होती आणि आता तिचे अभिनय कौशल्य, प्रसारमाध्यमांसमोर तिचा वावर पाहून तिचा चाहतावर्ग दिवसेंदिवस वाढतच आहे. एका चॅट शोमध्ये साराने तिला अभिनेता कार्तिक आर्यन फार आवडत असल्याचं सांगितलं होतं. तेव्हापासूनच या दोघांची खूप चर्चा झाली. रणवीरने एका कार्यक्रमात सारा-कार्तिकची भेटसुद्धा घडवून आणली. सारासाठी आता आणखी एक आनंदाची बाब म्हणजे कार्तिकसोबत तिला चित्रपटात काम करण्याची संधीसुद्धा मिळत आहे. इम्तियाज अली दिग्दर्शित आगामी चित्रपटात सारा आणि कार्तिक ही नवी जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘जब वी मेट’, ‘लव्ह आज कल’, ‘तमाशा’ यांसारख्या अनोख्या प्रेमकहाणींसाठी, चित्रपटांसाठी इम्तियाज प्रसिद्ध आहे. या चित्रपटात सारा आणि कार्तिकसोबतच अभिनेता रणदीप हुडासुद्धा भूमिका साकारत आहे. पंजाब आणि दिल्लीत याची शूटिंग पार पडणार आहे.

वाचा : ‘प्रत्येक गुन्ह्यातून उलगडते एक कथा’; अनुपम खेर यांचा ‘वन डे’ 

कार्तिकनेही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. ‘होय, मी इम्तियाज यांच्या चित्रपटात भूमिका साकारणार आहे. ते माझे आवडते दिग्दर्शक आहेत आणि त्यांच्यासोबत काम करण्याची माझी खूप इच्छा होती. अखेर ती पूर्ण होत आहे,’ असं तो म्हणाला. इम्तियाजचा हा चित्रपट दीपिका पदुकोण आणि सैफ अली खानच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा सिक्वल असल्याचं म्हटलं जात आहे. २००९ साली प्रदर्शित झालेला ‘लव्ह आज कल’ हा चित्रपट बॉक्स ऑफीसवर हिट ठरला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 10:50 am

Web Title: sara ali khan to romance her crush kartik aaryan in imtiaz ali next
Next Stories
1 ऑस्कर विजेता चित्रपट ‘ग्रीन बुक’ भारतात प्रदर्शित
2 ‘प्रत्येक गुन्ह्यातून उलगडते एक कथा’; अनुपम खेर यांचा ‘वन डे’
3 अभिनेत्री करीना कपूर लसीकरण मोहिमेची ब्रँड अॅम्बेसिडर
Just Now!
X