News Flash

वडिलांसोबतच्या चित्रपटातून साराने घेतला काढता पाय

मुलगी सारासोबत स्क्रिन शेअर करण्यासाठी सैफ अली खान फार उत्सुक होता.

सैफ अली खान आणि त्याची मुलगी सारा

सैफ अली खान आणि अमृता सिंग यांची मुलगी सारा अली खानच्या बॉलिवूड पदार्पणाबाबत प्रेक्षकांमध्ये फार उत्सुकता आहे. चित्रपटसृष्टीत येण्याआधीपासूनच सारा खूप चर्चेत आहे आणि सोशल मीडियावर तिचा मोठा चाहतावर्गसुद्धा आहे. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिम्बा’ या चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. कारण सुशांत सिंग राजपूतसोबतचा ‘केदारनाथ’ या चित्रपटाचं प्रदर्शन पुढे ढकलण्यात आलं आहे. साराच्या या चित्रपटांची उत्सुकता असतानाच तिला आणखी काही चित्रपटांचे ऑफर्स आल्याचं कळत आहे. त्यापैकी एका चित्रपटात ती वडील सैफ अली खानसोबत स्क्रिन शेअर करणार होती. पण काही कारणांमुळे तिने या चित्रपटातून काढता पाय घेतल्याचं समोर येत आहे.

दिग्दर्शक नितीन कक्करने त्याच्या चित्रपटासाठी सैफ अली खान आणि साराला विचारलं होतं. पुढच्या वर्षी मार्चमध्ये त्याच्या शूटिंगलाही सुरुवात होणार होती. लंडन आणि मुंबई याठिकाणी शूटिंगची स्थळं निश्चित करण्यात आली होती. सैफ आणि साराने या चित्रपटाचा करार स्विकारला नसला तरी त्यांनी दिग्दर्शकांना तोंडी होकार कळवला होता. यामध्ये सारा सैफच्या मुलीचीच भूमिका साकारणार होती. मात्र एका दुसऱ्या चित्रपटासाठी साराने हा प्रोजेक्ट सोडल्याचं वृत्त ‘डीएनए’नं दिलं आहे.

वाचा : आर. के. स्टुडिओ विकण्याबाबत करिना कपूर म्हणते..

‘हिंदी मिडियम’ या इरफान खानच्या चित्रपटाच्या सिक्वलसाठी तिने सैफसोबतच्या चित्रपटाला नकार दिला आहे. या सिक्वलसाठी तारखा निश्चित झाल्याने साराने नितीन कक्कर यांचा चित्रपट सोडला. इरफानच्या आजारपणामुळे सिक्वल लांबणीवर टाकण्यात आला होता. पण आता त्याच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याने ‘हिंदी मिडियम’चा सिक्वल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं कळतंय.

मुलगी सारासाठी सैफ अली खान नितीन कक्करच्या चित्रपटासाठी उत्सुक होता. पण आता सारानेच नकार दिल्याने सैफ ‘सेक्रेड गेम्स’ या वेब सीरिजच्या दुसऱ्या सिझनसाठी तयारी करत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2018 12:13 pm

Web Title: sara ali khan walks out of the father daughter film with saif
Next Stories
1 Mukesh Death Anniversary : अखेरच्या श्वासापर्यंत स्वरांची साधना करणाऱ्या मुकेश यांच्याविषयी बोलू काही…
2 Video : सलमानपाठोपाठ कतरिनाही झाली ‘डॉक्टर गुलाटी’साठी फोटोग्राफर
3 प्रिया म्हणते, प्रत्येकानं केरळवासीयांना केलेल्या मदतीचा आकडा जाहीर करावा कारण…
Just Now!
X