News Flash

Video : करिनाच्या ‘या’ भावाशी सारा खानला करायचं लग्न ?

दिग्दर्शक करण जोहरच्या 'कॉफी विद करण'च्या सेटवर साराने वडील सैफअली खानसोबत हजेरी लावली होती.

सारा अली खान, करिना कपूर

सैफ अली खानची मुलगी सारा अली खान बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यास सज्ज झाली असून ती ‘केदारनाथ’ आणि ‘सिम्बा’ या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे साराचे चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच ती लोकप्रिय झाली आहे. त्यामुळे तिच्याविषयी जाणून घेण्याची चाहत्यांना उत्सुकता असल्याचं दिसून येतं. यातच तिने बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्यासोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

चित्रपट दिग्दर्शक करण जोहरच्या ‘कॉफी विद करण’च्या सेटवर साराने वडील सैफअली खानसोबत हजेरी लावली होती. यावेळी तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. हा भाग लवकरच प्रसारित होणार असून त्यापूर्वी ‘स्टार वर्ल्ड’ने एक व्हिडिओ शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

The dynamic father-daughter duo are here to brew up some fun! #KoffeeWithKaran #KoffeeWithSaif #KoffeeWithSara #SaifAliKhan #SaraAliKhan

A post shared by Star World (@starworldindia) on

या शोमध्ये करणने साराला कोणासोबत लग्न करायला आवडेल ? आणि कोणत्या अभिनेत्याला डेट करायला आवडेल? असे प्रश्न विचारले. त्यावर उत्तर देत ‘रणबीरसोबत लग्न करण्याची इच्छा असून कार्तिक आर्यनला डेट करायला आवडेल’, असं साराने सांगितलं. ‘सोनू के टिटू की स्वीटी’ या चित्रपटामध्ये कार्तिक आर्यन झळकला आहे.

दरम्यान, सैफनेदेखील त्याचा होणारा जावई कसा असावा याविषयी त्याचं मत मांडल्याचं पाहायला मिळालं. सध्या या दोघा बापलेकीचा व्हिडिओ व्हायरल होत असून यात ते धमाल करताना दिसत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 3:01 pm

Web Title: sara ali khan wants to marry ranbir kapoor saif ali khan
Next Stories
1 Video : लग्नासाठी आतूर रणवीर विमानतळावर वाजवत होता ‘हे’ गाणं
2 दीप- वीरच्या लग्नासाठी सजला व्हिला, पाहा फोटो
3 Video : रणवीर सिंगने तेजस्विनीला दिलं खास दिवाळी गिफ्ट
Just Now!
X