News Flash

प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी रणवीर पाठोपाठ आता साराही पोहोचली चित्रपटगृहात

तिनं स्वत:साठी चित्रपटाचं तिकिटही खरेदी केलं आणि सामान्य प्रेक्षकांसारखा चित्रपटही पाहिला.

रणवीर पाठोपाठ प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी खुद्द सारा अली खानदेखील चित्रपटगृहात जाऊन पोहोचली. ‘सिम्बा’ला समीक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. सोशल मीडियावर प्रेक्षकांनीही सिम्बाचं भरभरून कौतुक केलं. या सगळ्याचा अनुभव याची देही याची डोळा घेण्याचा मोह साराही आवरला नाही . म्हणून चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी सारानं जवळचं चित्रपटगृह गाठलं.

Video : आली लहर केला कहर! चित्रपटगृहाच्या छतावर रणवीरचा छप्पर फाड के परफॉर्मन्स

तिकीट खरेदी करून तिनं चित्रपट पाहिला. यावेळी तिला भेटलेल्या काही प्रेक्षकांनी तिचं कौतुकही केलं. तसेच तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छाही दिल्या. सारानं ‘केदारनाथ’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. हा चित्रपट ७ डिसेंबरला प्रदर्शित झाला. पहिल्याच चित्रपटात तिनं आपल्या अभिनयानं आणि हसऱ्या स्वभावानं सगळ्यांचं मन जिंकलं.

तिचा या आठवड्यात प्रदर्शित झालेला ‘सिम्बा’ चित्रपटही प्रेक्षकांची मनं जिंकण्यास तितकाच यशस्वी ठरला. अल्पावधीत प्रेक्षकांकडून मिळालेल्या या भरभरून प्रेमानं साराही भारावून गेली आहे. याआधी प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी रणवीरही मुंबईतल्या एका चित्रपटगृहात पोहोचला होता. इतकंच नाही तर चित्रपटगृहाच्या छतावर चढून त्यानं डान्सही केला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2018 6:04 pm

Web Title: sara ali khan went for a movie and watched her own films in one of the theatres in mumbai
Next Stories
1 वरुणसोबत रेमोच्या चित्रपटात झळकणार नाही कतरिना, व्यग्र वेळापत्रकामुळे माघार
2 पाठकबाईंपुढे सरंजामेची जादू चालेना, या ठरल्या मराठीतल्या लोकप्रिय मालिका
3 ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ ऑस्करला पाठवा- किरण खेर
Just Now!
X