02 April 2020

News Flash

स्लिम झाली अन् अडचणीत आली; सारा अली खानला नवा ताप

सारा अली खानला वजन कमी करणं पडलं महागात

सारा अली खान बॉलिवूडमधील सर्वात फिटेस्ट अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. परंतु सिनेसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी सारा आजच्या इतकी फिट नव्हती. किंबहूना त्यावेळी तिचं वजन ९६ किलो इतकं प्रचंड होतं. मात्र नियमीत व्यायाम व योग्य आहार घेऊन साराने वजन कमी केलं. परंतु वजन कमी करणं देखील आता तिला काहीसं त्रासदायक ठरत आहे.

अवश्य वाचा – अमिताभ बच्चन यांना एका प्रश्नानं सोडलंय भंडावून; तुमच्याकडं उत्तर आहे का ?

अवश्य वाचा – “बुलाती है मगर जाने का नहीं” ब्रेकअप करणाऱ्या अभिनेत्रीला बॉयफ्रेंडचे भन्नाट उत्तर

सारा अलिकडेच तिच्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अमेरिकेला गेली होती. त्यावेळी विमातळावरच तिला थांबवलं गेलं. कारण तिच्या पासपोर्टवर तिचा स्थूल असतानाचा फोटो आहे. या फोटोमुळे विमानतळावरील अधिकाऱ्यांना तिला ओळखताच येत नव्हते. सारा दुसऱ्याच कुठल्यातरी मुलीच्या पासपोर्टवर प्रवास करत असल्याचा त्यांचा समज झाला. मात्र अखेर तिची कसून चौकशी झाल्यावर ती साराच आहे हे सिद्ध झाले. हा किस्सा साराने इस्ट इंडिया कंपनी या शोमध्ये सांगितला.

अवश्य पाहा – मराठमोळ्या मानसीच्या अदा पाहून व्हाल फिदा

अवश्य पाहा – ऐश्वर्या राय सारखी दिसणारी ‘ही’ सौंदर्यवती आहे तरी कोण?

‘लव्ह आज कल’ या चित्रपटाला भारतात मिश्र प्रतिसाद मिळत आहे. पहिल्या तीन दिवसांत चित्रपटाने जवळपास २५ कोटी रुपयांची कमाई केली. या चित्रपटात सारा अली खान व कार्तिक आर्यन यांनी मुख्य भूमिका साकारली आहे. २००९ साली प्रदर्शित झालेल्या ‘लव्ह आज कल’ या चित्रपटाचा हा प्रिक्वल आहे. बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरलेल्या त्या चित्रपटात सैफ अली खान आणि दीपिका पदुकोण यांनी मुख्य व्यक्तिरेखा साकारली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2020 4:24 pm

Web Title: sara ali khans passport photo gets her in trouble at american airports mppg 94
Next Stories
1 ‘खऱ्या कलेला डावललं’; नेटकऱ्यांनी उपसलं #BoycottFilmFare चं अस्त्र
2 अमिताभ बच्चन यांना एका प्रश्नानं सोडलंय भंडावून; तुमच्याकडं उत्तर आहे का ?
3 आमच्या मुलाखती छापून चालणाऱ्या मासिकांकडून अवॉर्ड घेणं मुर्खपणा; सलमानचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल
Just Now!
X