News Flash

निक्की तांबोळीमुळे साराच्या डोळ्याला दुखापत; ‘बिग बॉस’मध्ये एडिट केला सीन

बिग बॉसच्या घरातील एका टास्कदरम्यान साराला निक्की तांबोळीकडून दुखापत झाली.

सारा गुरपाल

‘बिग बॉस १४’ हा रिअॅलिटी शो जसा सुरू झाला तसंच त्यातील वादविवादसुद्धा सुरू झाले. बिग बॉसच्या घरात रंगत असलेल्या टास्कदरम्यान एकमेकांवर कुरघोडी करणं, एकमेकांना कमी लेखणं इथपासून ते आता एकमेकांना शारीरिक दुखापत करण्यापर्यंतही मजल गेली आहे. ‘बिग बॉस १४’च्या घरातून गायिका सारा गुरपाल नुकतीच बाहेर पडली आहे. मात्र सोशल मीडियावर तिची अजूनही चर्चा आहे. साराला शोमधून काढणं चुकीचं असल्याचं मत अनेकांनी मांडलं. त्यातच तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बिग बॉसच्या घरातील एका टास्कदरम्यान साराला निक्की तांबोळीकडून दुखापत झाली. इम्युनिटी टास्कदरम्यान सारा जेव्हा बुलडोझरवर बसली तेव्हा तिला तिथून उठवण्याचा जोरदार प्रयत्न निक्कीकडून केला जात होता. त्याच प्रयत्नात निक्कीचा हात साराच्या तोंडाजवळ गेला आणि तिची नखं साराच्या डोळ्याला लागली. दुखापत होताना आणि झाल्यानंतरचा काही भाग बिग बॉसच्या एपिसोडमधून एडिट करण्यात आला. ‘हिंदुस्तान टाइम्स’ने हे वृत्त दिलं.

आणखी वाचा : कार्यक्रम सुरू असतानाच बिग बींचा कम्प्युटर पडला बंद आणि..

एजाझ खान, हिना खान आणि गौहर खान हे साराच्या दुखापतीबद्दल एकमेकांशी बोलत होते पण नंतर ते पुन्हा टास्कमध्ये मग्न झाले. साराच्या डोळ्यावर सध्या उपचार सुरू असून त्यानंतर ती तिच्या गावी परतणार असल्याचं म्हटलं जात आहे. दुसरीकडे साराने तिच्या लग्नाची गोष्ट लपवल्यामुळे तिला बिग बॉसच्या घरातून काढलं जात असल्याची चर्चा आहे. पंजाबी गायक तुषार कुमारने सारासोबत लग्न केल्याचा खुलासा केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 14, 2020 3:20 pm

Web Title: sara gurpal eye injury pics emerge online was hurt by nikki tamboli during edited bigg boss 14 task ssv 92
Next Stories
1 ‘२ मिनिटांच्या प्रसिद्धीसाठी काहीही’; सलमान-अक्षयवर आरोप करणारा केआरके होतोय ट्रोल
2 होणाऱ्या पतीसोबत काजल अगरवालचे फोटो व्हायरल
3 “जर मला काही झाले तर सलमान, करण जबाबदार असतील,” अभिनेत्याचे खळबळजनक ट्विट
Just Now!
X