25 March 2019

News Flash

बिकीनीतल्या फोटोमुळे सारा खान ट्रोल; नेटकऱ्यांनी दिला धर्म बदलण्याचा सल्ला

अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून तू मुस्लीम धर्माचा अपमान केला आहेस, अशीही टीका काहींनी केली.

सारा खान

प्रसिद्ध टेलिव्हिजन अभिनेत्री सारा खान नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. दुबईत सुट्ट्यांचा आनंद घेणाऱ्या साराने सोशल मीडियावर नुकतेच काही फोटो शेअर केले. पण याच फोटोंमुळे नेटकऱ्यांनी तिला चांगलंच फैलावर घेतलं आहे. बिकीनीतले फोटो शेअर केल्याने अनेकांनी तिच्यावर टीका केली.

नेटकऱ्यांच्या नकारात्मक प्रतिक्रियांची पूर्वकल्पना बहुधा साराला होती. म्हणूनच तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘निंदा करणारे हे संभ्रमित प्रशंसक असतात.’ काहींनी तर तिला धर्म बदलण्याचाही सल्ला दिला. अंगप्रदर्शन करणारे कपडे घालून तू मुस्लीम धर्माचा अपमान केला आहेस, अशीही टीका काहींनी केली.

Web Series : एका प्रेमळ जोडप्याची कथा घेऊन येत आहे ‘द गुड व्हाइब्ज’

आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमुळे सारा नेहमीच चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी साराचा न्यूड व्हिडिओ तिच्या बहिणीने चुकून सोशल मीडियावर पोस्ट केला. ही चूक लक्षात येताच साराची बहिण आयरा खानने तो व्हिडिओ डिलीट केला. मात्र तोपर्यंत तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला.

‘बिदाई’ या मालिकेत साकारलेल्या साधनाच्या भूमिकेमुळे सारा घराघरात पोहोचली. त्यानंतर तिला ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोमध्ये पाहिलं गेलं.

First Published on August 10, 2018 4:47 pm

Web Title: sara khan trolled for posing in a bikini haters demand the actress to change her religion