04 March 2021

News Flash

Sarabhai vs Sarabhai: ‘साराभाई’ मधले हे बदलं तुम्हालाही नक्की आवडतील

वेब सीरिजमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत

‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या मालिकेने लोकांच्या मनावर अक्षरशः अधिराज्य केले होते. २००४ मध्ये आलेल्या या मालिकेचे चाहते नसतील असा एकही माणूस शोधून सापडणार नाही. आता ही मालिका वेब सीरिजच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. नुकतेच साराभाई कुटुंबियांनी मिळून फेसबुक लाइव्ह चॅटही केले. निर्माता जेडी मजेठीयाने फेसबुकच्या या चॅटची धुरा आपल्या हातात घेऊन साराभाईंचं हे नवं घर कसं असणार याची छोटीशी झलक दाखवून दिली. साराभाईंचं हे नवीन घर आधीपेक्षा नक्कीच मोठं आणि आकर्षक आहे. जेडीने चाहत्यांचे आभार मानत फेसबुक लाइव्ह चॅटला सुरूवात केली. पण तुम्हाला माहित आहे का… ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ या वेब सीरिजमध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या वेब सीरिजमध्ये नेमके कोणते बदल करण्यात आलेत.

फेसबुक लाइव्ह चॅटमध्ये साराभाईचा सेटची झलक तर दाखविण्यात आलीच पण त्याचसोबत यावेळी रोसेश, इंद्रवर्धन, माया, साहिल आणि मोनिशा ही संपूर्ण टीमही तेथे उपस्थित होती. वेब सीरिजसाठी रात्रीच्या वेळी चित्रीकरण करत असतानाच या टीमने चक्क नाइट ड्रेसमध्येच चाहत्यांशी लाइव्ह संवाद साधला.

रोसेशचे लग्न आणि नवा लुकः रोसेशची भूमिका साकारणारा अभिनेता राजेश कुमार वेब सीरिजमध्येही याच व्यक्तिरेखेत दिसणार आहे. मी आधी हवे सारखा होतो आता यांनी मला नवीन भागात कपाट बनवलं आहे. त्यामुळे वेब सीरिजमध्ये त्याची बढती झाली असेच म्हणावे लागेल. राजेश म्हणाला की, इंद्रवर्धन आणि साहिल या पर्वात अधिक खट्याळ असतील तर माया अजून शिस्तप्रिय असेल आणि मोनिशा आधीसारखीच भोळी असेल. तसंच या चॅटमध्ये रोसेश त्याच्या लग्नाबद्दल काही तरी सांगणार होता पण मोनिशाने त्याला रोखले. त्यामुळे साराभाईच्या या पर्वात खरंच रोसेशचं लग्न झालं असेल का हा प्रश्न आता अनेकांना पडतो आहे.

sarabhai-759

साहिल आणि मोनिशाचा मुलगाः या शोचा दिग्दर्शक देवेन भोजवानी अर्थात साराभाई यांचा जावई दुशंतने मालिकेत आणखीन काही व्यक्तिरेखांचा समावेश केल्याचं सांगितलं. साहिल आणि मोनिशाचा मुलगा हे आणखीन एक वेगळं रसायन प्रेक्षकांना पाहायला मिळणार असल्याचे तो म्हणाला. या मुलात माया, साहिल आणि मोनिशा यांचे थोडे थोडे गुण पाहायला मिळतील असेही त्याने सांगितले.

मोनिशा आणि तिचे ‘डिस्काऊंट’ प्रेम: रुपाली गांगुलीने साकारलेली मोनिशा आजही अनेकांच्या लक्षात आहे. या नव्या मालिकेतही ती तेवढीच कंजुष आणि डिस्काऊंटवर अतोनात प्रेम असलेली मोनिशा दाखवली आहे. आजही ती फाटलेले कपडे वापरत असली तरीही ती तिचं घर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते अशी कबुली तिने दिली. आता ती खरंच तिचं घर स्वच्छ ठेवते की नाही हे तर मालिका सुरू झाल्यावरच कळेल.

माया साराभाईचे वेगळेच किस्सेः रत्ना पाठक शाह यांनी साकारलेली माया दुसरं कोणीच साकारु शकत नाही असा छाप आपल्या या भूमिकेवर त्यांनी सोडला आहे. या मालिकेतही त्या तेवढ्याच उच्चभ्रू वस्तीतल्या सुसंस्कृत महिलेची भूमिका साकारताना दिसणार आहेत. मोनिशासोबत असलेलं त्यांचं अनोखं नातंही त्याचपद्धतीने सर्वांसमोर येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 4, 2017 1:00 pm

Web Title: sarabhai vs sarabhai returns cast revealed about the new season facebook live watch video 2
Next Stories
1 ऐश्वर्याविना बच्चन कुटुंबाची शाही लग्नाला उपस्थिती
2 ऋषिकेशमध्ये साधुसंतांसोबत दीपिकाने केली गंगा आरती
3 BLOG : …अॅण्ड अॅवार्ड गोज् टू दादा!
Just Now!
X