22 January 2021

News Flash

‘लक्ष्मी’च्या यशानंतर शरदच्या आयुष्यात आणखी एक आनंदाचा क्षण, फोटो शेअर करत म्हणाला..

त्याने सोशल मीडियावर फोटो शेअर केला आहे.

डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर ९ नोव्हेंबर रोजी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारचा ‘लक्ष्मी’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. या चित्रपटाने परदेशात चांगली कमाई केली. पण भारतीय प्रेक्षकांना चित्रपट फारसा आवडला नाही. या चित्रपटात अक्षय कुमार आणि कियारा अडवाणी मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होताच या चित्रपटात आणखी एक अभिनेता असल्याचे समोर आले. तो अभिनेता म्हणजे शरद केळकर. प्रेक्षकांना शरद केळकरची भूमिका प्रचंड आवडली. त्यांनी सोशल मीडियाद्वारे शरदच्या भूमिकेचे कौतुक केले. आता शरद केळकरने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आनंद व्यक्त केला आहे.

‘लक्ष्मी’ या चित्रपटातील शरद केळकरची भूमिका प्रेक्षकांना विशेष आवडली. त्यानंतर त्याच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये वाढ झाली आहे. नुकताच शरदचे इन्स्टाग्राम अकाऊंटवर ५ लाखापेक्षा जास्त फॉलोअर्स झाले आहेत. त्यामुळे त्यांने आनंद व्यक्त करत सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sharad Kelkar (@sharadkelkar)

‘आता आपले कुटुंब ५ लाख लोकांचे झाले आहे. तुम्ही माझ्यावर इतके प्रेम करता त्याबद्दल तुमचे आभार’ असे शरद केळकरने फोटो शेअर करत म्हटले आहे.

आणखी वाचा- ‘लक्ष्मी’ चित्रपट पाहता अक्षय ऐवजी शरद केळकरवर नेटकरी फिदा

‘लक्ष्मी’ चित्रपटात खऱ्या लक्ष्मीची भूमिका शरदने साकारली आहे. या चित्रपटाविषयी प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली असून वेळ वाया घालवण्यासारखं असल्याचे म्हटले आहे. पण चित्रपटातील शरद केळकरची भूमिका प्रेक्षकांना प्रचंड आवडली असल्याचे दिसत होते. दाक्षिणात्य सुपरस्टार राघव लॉरेन्स दिग्दर्शित लक्ष्मी हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासून सातत्याने चर्चेत आला होता. या चित्रपटाला अनेक संकटाचादेखील सामना करावा लागला. या चित्रपटावर लव्हजिहाद, धार्मिक भावना दुखावणे असे अनेक आरोप करण्यात आले होते. त्यासोबतच या चित्रपटाच्या नावावरदेखील आक्षेप घेण्यात आला होता. त्यामुळे ‘लक्ष्मी बॉम्ब’ हे नाव बदलून ‘लक्ष्मी’ हे नवीन नाव ठेवण्यात आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 18, 2020 3:43 pm

Web Title: sarad kelkar instagram followers increases avb 95
Next Stories
1 अमिताभ बच्चन यांनी केले स्वत:लाच ट्रोल? हा फोटो पाहून तुम्हालाही येईल हसू
2 अस्ताव्यस्त पडलेला कचरा पाहून वैतागला मिलिंद सोमण; पोस्ट शेअर करत म्हणाला…
3 कंगना रणौत, रंगोली चंडेल पुन्हा आल्या अडचणीत; मुंबई पोलिसांनी बजावलं समन्स
Just Now!
X