News Flash

मोठ्या मालकांनी घातला पोहे बनविण्याचा घाट

सरस्वतीच्या पायाला दुखापत झाली

कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे.

कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती मालिका सध्या प्रेक्षकांची लोकप्रिय मालिका आहे. तितिक्षा तावडे म्हणजे तुमची लाडकी सरस्वती ही सगळ्यांची लाडकी अभिनेत्री आहे. सरस्वती मालिकेमध्ये सध्या सरू आणि राघवचे एक वेगळेच नाते बघायला मिळत आहे. सरस्वतीच्या आयुष्यात गेल्या काही महिन्यांमध्ये बऱ्याच घटना घडून गेल्या ज्याला सरस्वती खंबीरपणे सामोरी गेली. आता राघवदेखील तिच्या पाठीशी उभा आहे खंबीरपणे. सरस्वतीला खुश ठेवण्यासाठी राघव बरेच प्रयत्न करत आहे. तसेच तिची खूप काळजी घेत आहे. सरस्वती मालिकेमध्ये सरू आणि मोठे मालक म्हणजेच राघव यांची लव्ह स्टोरी प्रेक्षकांना खूपच आवडत आहे. सरस्वतीचा रुसवा घालविण्यासाठी मोठ्या मालकांनी अलीकडेच नवीन साड्या आणि गळ्यातला सुंदर नेकलेस देखील तिला दिला होता. सरूला देखील तो खूप आवडला आणि तिने ते घालून मोठ्या मालकांना म्हणजेच राघवला खुश देखील केले. नेकलेस आणि साडी इथपर्यंत सगळ छानच होत. पण मोठ्या मालकांनी आता चक्क पोहे बनविण्याचा घाट घातला, ही सगळीच गंमत आहे.

saraswati-serial-1

त्याच झालं अस की, सरस्वतीच्या पायाला दुखापत झाली आणि त्यामुळे तिला चालणे कठीण होऊन बसले. बायकोला होत असलेला हा त्रास बघून स्वत: राघवने पोहे बनविण्याचा बेत केला. पहिल्यांदा पोहे बनवले तेव्हा त्यामध्ये मीठ कमी पडले म्हणून त्याने पुन्हा थोडे मीठ टाकले पण ते जरा जास्तच पडले आता हे जास्त मीठ पडलेले पोहे सरस्वती खाणार का ? तिला हे पोहे आवडतील का हा प्रश्नच आहे. विशेष म्हणजे प्रेमाने आपल्या नवऱ्याने आपल्यासाठी काहीतरी बनवले आहे ही भावनाच मनाला सुखवणारी आहे. ही सगळी गंमत तुम्हाला कलर्स मराठी वाहिनीवरील सरस्वती मालिकेत पाहता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2017 8:13 am

Web Title: saraswati serial colors marathi rahgav making kanda poha for saru
Next Stories
1 नवे चित्रपट मनाला न भिडणारे – डॉ. जब्बार पटेल
2 ‘हृदयेश फेस्टिव्हल’मध्ये सांगीतिक मेजवानी
3 FACEBOOK LIVE CHAT : उर्मिला आणि क्रांतीशी ‘लाईव्ह संवाद’ साधण्याची संधी!
Just Now!
X