News Flash

‘सरबजीत’चे नवे पोस्टर प्रसिद्ध

'सरबजीत' या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर टि्वटरवर बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले.

चश्मा घातलेल्या रणदीपचा चेहरा अतिशय जवळून पोस्टरवर दर्शविण्यात आला आहे.

ऐश्वर्या राय बच्चन आणि रणदीप हुडा यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘सरबजीत’ या आगामी चित्रपटाचे नवीन पोस्टर टि्वटरवर बुधवारी प्रसिद्ध करण्यात आले. सरबजीत सिंगच्या जीवनावर आधारीत या चित्रपटाची चाहते आतुरतेने वाट पाहात आहेत.
भावाच्या सुटकेसाठी बहिणीचा संघर्ष दर्शविणाऱ्या या चित्रपटाचे हे पोस्टर बरेच काही सांगून जाते, अशा स्वरुपाचा संदेश पोस्टरसह टि्वटरवर पोस्ट करण्यात आला आहे.
चष्मा घातलेल्या रणदीपचा चेहरा अतिशय जवळून पोस्टरवर दर्शविण्यात आला आहे. रणदीपने घातलेला चष्मा मध्यभागी तुटला असून, दोरीने बांधलेला आहे. पोस्टरच्या उजव्या बाजूस घाईत असलेली ऐश्वर्या राय बच्चन नजरेस पडते. चित्रपटात ऐश्वर्या सरबजीतची बहिण दलबीर कौरची व्यक्तीरेखा साकारत आहे.
शेतकरी असलेला सरबजीत दारूच्या प्रभावाखाली भारत-पाकिस्तान सीमारेषा पार करतो. पाकिस्तानात त्याला भारतीय गुप्तहेर ठरविण्यात येते. २३ वर्ष पाकिस्तानी तुरुंगात असलेल्या सरबजीतला सहकैदी ठार मारतात. अशा स्वरुपाची चित्रपटाची कथा आहे.
‘मेरी कोम’ चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार हेच या चित्रपटाचे दिग्दर्शक असून, चित्रपटात रिचा चढ्ढा आणि दर्शन कुमारदेखील दिसणार आहेत. १९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.

 

‘सरबजीत’चा आणखी एक पोस्टर

Sarbjit 3rd Poster

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2016 3:00 pm

Web Title: sarbjits new poster aishwarya rai randeep hoodas expressions reveal the pain
टॅग : Bollywood
Next Stories
1 Video: One Night Stand चित्रपटातील बोल्ड सनीच्या ‘इजाजत’ गाण्याचा व्हिडिओ प्रसिध्द
2 नवाजुद्दीन सिद्दीकीचा पहिला म्युझिक व्हिडिओ ‘इश्क अनोखा’
3 खासगी आयुष्यात अनेक अभिनेत्रींची अवस्था मोलकरणीपेक्षा वाईट- महेश भट
Just Now!
X