News Flash

‘मी माझे तरुणपण पुन्हा जगतो आहे’- दर्शन जरीवाला

'सरगम की साढेसाती' या मालिकेत ते छेदिलाल ही भूमिका साकारत आहेत.

‘सरगम की साढेसाती’ ही नवीन सिटकॉम प्रेक्षकांच्या मनाला गुदगुल्या करून हसवते आहे, त्याचबरोबर त्यातील भावभावना प्रेक्षकांच्या हृदयाला स्पर्श देखील करत आहेत. ही विनोदी मालिका सरगम नावाची तरुणी आणि साडेसात या संख्येशी असलेले तिचे खास नाते यांच्याभोवती फिरते. सरगमचे सासरे छेदिलाल (दर्शन जरीवाला) हे अवस्थी कुटुंबातील कवडीचुंबक आहेत आणि पैसे वाचवणे हेच त्यांच्या आयुष्यातील अंतिम ध्येय आहे. त्यांना अवस्थी परिवरावर हुकूमत गाजावायला आवडते आणि प्रत्येक सदस्याने त्यांच्या नियमांनुसार जगावे अशी त्यांची अपेक्षा आहे.

सरगम की साढेसातीच्या कलाकारसंचात वेगवेगळ्या पठडीचे गुणी, विचारवंत आणि गंमतीशीर कलाकार सहभागी आहेत, ज्यांच्यामुळे शूटिंगचे वातावरणच संपूर्णपणे बदलून गेले आहे. सेट्सवर तुम्हाला कधीच मरगळलेले वातावरण दिसणार नाही. इथे सतत हास्याच्या फैरी झडत असतात.

आपल्या सह-कलाकारांसोबत आपला काम करण्याचा अनुभव सांगताना दर्शन जरीवाला यांनी सांगितले, “मला या नवीन आणि तरुण कलाकारांसोबत काम करायला आवडते, कारण त्यांची भूक वेगळ्या प्रकारची आहे. ते खूप चुणचुणीत आहेत, मजेदार आहेत आणि एकंदरच त्यांची विचारप्रणाली वेगळ्या प्रकारची आहे.” ते पुढे म्हणाले, “या मालिकेतले माझे सह-कलाकार इतके गंमतीशीर आणि उत्साहाने सळसळणारे आहेत की मला देखील वाटू लागते की मीही त्यांच्यातलाच एक आहे. त्यांना पाहून मला माझे पूर्वीचे शूटिंगचे दिवस आठवतात, जेव्हा आम्ही खूप हास्यविनोद, थट्टा-मस्करी करायचो, खोड्या काढायचो. त्यामुळे अशा तरुण कलाकारांबरोबर काम करणे खूप आल्हाददायक आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 3, 2021 6:45 pm

Web Title: sargam ki sadhesati serial update avb 95
Next Stories
1 ‘भाजपाने पोलीस, ईडी, सीबीआय यांचा वापर…’, अभिनेत्याचे ट्वीट चर्चेत
2 आर्यन खानचे क्लबमधील वागणे पाहून राहुल वैद्य गोंधळला, अनुभव सांगताना म्हणाला…
3 इब्राहिमचा रॉयल लूक, लग्न सोहळ्यातील नवाबी रुबाब
Just Now!
X