News Flash

अमिताभ यांनी केली जया बच्चनची पोलखोल

पत्नी जया बच्चन यांचेही एक टोपणनाव आहे

बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांना अधिकतर लोक ‘बिग बी’ या नावाने ओळखतात. हे नाव म्हणजे त्यांचे अधिकृत टोपण नावच झाले आहे. पण तुम्हाला माहित आहे का की त्यांची पत्नी जया बच्चन यांचेही एक टोपणनाव आहे. नुकतेच एका मासिकाशी बोलताना खुद्द अमिताभ यांनीच याचा खुलासा केला. या मुलाखतीत त्यांनी जया यांचे भरभरुन कौतूक केले. जया किती शांत आणि हुशार आहे हे सांगितले. ते यावेळी म्हणाले की, कुटुंबात तिन्ही बहिणींमध्ये जया सगळ्यात मोठी आहे. जया यांच्या बहिणी त्यांना ‘दीदीभाई’ या नावाने हाक मारतात.

अमिताभ यांनी सांगितले की ज्या वातावरणात त्या मोठ्या झाल्या त्यामुळेच जयामध्ये आत्मविश्वास आला आणि ती अधिक सशक्त बनली. जया एनसीसीमध्ये होत्या आणि तेव्हा त्या त्यांच्या तुकडीच्या प्रमुख होत्या. यामुळे त्यांच्यात नेतृत्व करण्याचे गुण वृद्धिंगत झाले. पण आता घरापासून दूर राहिल्यानंतरही हे गुण कमी झाले नाहीत. आजही त्यांच्यात हे गुण प्रकर्षाने जाणवतात. म्हणूनच जया यांची भावंडं त्यांना आजही ‘दीदीभाई’ याच नावाने हाक मारतात.

जर अमिताभ यांच्या व्यावसायिक सिनेमांबद्दल विचार केला तर, त्यांचा ‘सरकार-३’ हा आगामी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्दर्शक राम गोपाल वर्मा या सिनेमाचे दिग्दर्शन करणार असून ‘सरकार’ या सिनेमाचा हा तिसरा भाग आहे. या सिनेमात अमिताभ यांच्याशिवाय जॅकी श्रॉफ, यामी गौतम आणि अर्जुन रामपाल यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. या सिनेमाचे कथानक काय असणार हे अजून कळले नसले तरी स्वतः रामूने या सिनेमाचा फर्स्ट लूक त्याच्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला होता. आता हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर किती कमाई करतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 15, 2016 6:36 pm

Web Title: sarkar 3 star amitabh bachchan revealed secret nickname of wife jaya bachchan
Next Stories
1 आता सलमान क्रिकेटच्या मैदानात
2 ‘सुपरमून’ पाहून भारावला किंग खान
3 ५००-१०००च्या नोटा रद्द केल्याचा चित्रपटसृष्टीवर काही परिणाम होणार नाही- ओम पुरी
Just Now!
X