News Flash

कतरिनामुळे ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मधून माझी गच्छंती- सरोज खान

बॉलिवूडमधल्या प्रसिद्ध कोरिओग्राफर म्हणून त्या ओळखल्या जातात

सरोज खान या बॉलिवूडमधल्या सर्वात नावाजलेल्या कोरिओग्राफर म्हणून ओळखल्या जातात. बॉलिवूडमधल्या अनेक कलाकरांना त्यांनी आपल्या तालावर नाचवलं असं म्हणायला हरकत नाही. माधुरी दीक्षित, करिना कपूर, ऐश्वर्या राय, श्रीदेवी अशा अनेक अभिनेत्रींना त्यांनी नृत्यांचे धडे दिले. मात्र सरोज खान यांची अभिनेत्री कतरिना कैफमुळे ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’ मधून गच्छंती करण्यात आली होती.

‘कलंक’ चित्रपटात सरोज खान कोरिओग्राफर आहेत. एका मुलाखतीत त्यांनी कतरिनासोबत आलेला वाईट अनुभव सांगितला. ‘ठग्ज ऑफ हिंदोस्तान’मधील सुरैया जान हे गाणं कोरिओग्राफ करण्याची जबाबदारी सरोज खान यांच्यावर होती. मात्र डान्सचा सराव झाल्याशिवाय मी चित्रीकरण करणार नाही असं कतरिनानं सांगितलं. कतरिनाच्या नकारामुळे माझी गच्छंती करण्यात आली असं सरोज खान म्हणाल्या.

सरोज खान यांच्यानंतर प्रभु देवा यांनी ठग्जसाठी कोरिओग्राफरची जबाबदारी स्वीकारली. कतरिनासोबत मला काम करायला आवडलं असतं असंही त्या म्हणाल्या. गेल्या काही वर्षांपासून त्या बॉलिवूडमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चा आहेत. ‘कलंक’नंतर त्या निवृत्ती घेतील असं म्हटलं जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2019 6:33 pm

Web Title: saroj khan lost thugs of hindostan because of katrina kaif
Next Stories
1 पहलाज निहलानी यांनी अंतर्वस्त्राशिवाय फोटोशूट करायला सांगितले होते- कंगना
2 …म्हणून तानाजी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली
3 ही असतील ‘सेक्रेड गेम्स २’च्या एपिसोड्सची नावं?
Just Now!
X