टेलिव्हिजन विश्वात सध्या लग्नाचे वारे वाहत असून आणखी एक प्रसिद्ध जोडी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. टेलिव्हिजनचे ‘लव्ह बर्ड्स’ दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम २६ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून ही जोडी प्रकाशझोतात आली. भोपाळमध्ये शोएबच्या निवासस्थानी मोजक्या कुटुंबियांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडणार आहे.

विराट कोहली- अनुष्का शर्मा, गौतम रोडे- पंखुरी अवस्थी या सेलिब्रिटींप्रमाणेच दीपिका आणि शोएबनेही ‘सिक्रेट वेडिंग’चा पर्याय निवडला आहे. प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यासाठीच भोपाळमध्ये साधेपणाने लग्न करण्याचा विचार या दोघांनी केला आहे. त्यानंतर मुंबईत मित्रपरिवारासाठी रिसेप्शनचं आयोजन करण्यात येणार आहे.

https://www.instagram.com/p/BfUs-BCl1kB/

https://www.instagram.com/p/BfSz-XSBkLn/

https://www.instagram.com/p/BfVtKQlH2Zu/

पारंपरिक मुस्लीम पद्धतीनुसार निकाह होणार असून लग्नसोहळ्याची तयारीही सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दोघेही भोपाळला गेले असून यावेळी त्यांनी ट्रेनमधून प्रवास केला. या प्रवासादरम्यानचे काही फोटो दीपिकाने सोशल मीडियावर शेअर केले असून यातील एक फोटो ‘दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे’ या चित्रपटाची आठवण करून देतो. सात वर्षांपूर्वी ‘ससुराल सिमर का’ या मालिकेच्या सेटवर दोघांची भेट झाली.  दीपिका आणि शोएबचा चाहतावर्गही मोठा असल्याने सोशल मीडियावर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.