News Flash

‘ससुराल सिमर का’ फेम दीपिका- शोएब अडकले लग्नबंधनात

सात वर्षांपूर्वी या दोघांची मालिकेच्या सेटवर भेट झाली

टेलिव्हिजन विश्वातील बहुचर्चित जोडी दीपिका कक्कर आणि शोएब इब्राहिम गुरुवारी लग्नबंधनात अडकले. ‘ससुराल सिमर का’ या लोकप्रिय मालिकेतून ही जोडी प्रकाशझोतात आली. दीपिका- शोएबच्या प्री-वेडिंगचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यापासून त्यांच्या लग्नाची जोरदार चर्चा होती. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शोएबच्या गावी भोपाळमध्ये हा लग्नसोहळा पार पडला. सात वर्षांपूर्वी या दोघांची मालिकेच्या सेटवर भेट झाली. या भेटीचे हळूहळू मैत्री आणि नंतर प्रेमात रुपांतर झाले. गुरुवारी पारंपरिक मुस्लीम पद्धतीने निकाह करत दोघांनीही आपल्या नात्याला एक नवीन ओळख दिली.

काही दिवसांपूर्वीच दीपिका आणि शोएबच्या इन्स्टाग्रामवर प्री-वेडिंगचे फोटो पाहायला मिळाले आणि तेव्हापासूनच चाहत्यांमध्ये या दोघांच्या लग्नाविषयी उत्सुकता निर्माण झाली. सध्या सोशल मीडियावर मेहंदी, संगीत या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओही पाहायला मिळत आहेत. ‘सुन मेरे हमसफर’ या गाण्यावर दीपिका आणि शोएब संगीतच्या कार्यक्रमात डान्स करताना पाहायला मिळत आहेत.
प्रसारमाध्यमांपासून दूर राहण्यासाठी भोपाळमध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न करण्याचा निर्णय दोघांनी घेतला होता. तर मुंबईत परतल्यावर मित्र-परिवारासाठी रिसेप्शनचे आयोजन करणार असल्याचंही म्हटलं जात आहे.  दीपिका आणि शोएबचा चाहतावर्गही मोठा असल्याने सोशल मीडियावर सध्या चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2018 1:01 pm

Web Title: sasural simar ka fame shoaib ibrahim marries dipika kakar see photos videos
Next Stories
1 अरे ही तर ‘सेम टु सेम’ प्रियांका चोप्राच!
2 ‘आरजे’च्या रुपात गप्पा मारण्यासाठी तेजश्री प्रधान सज्ज
3 दास्तान-ए-मधुबाला भाग १०
Just Now!
X