News Flash

सलमानच आहे… फक्त सातारचा आहे!

छोट्या गावातून येणाऱ्या एका सामान्य मुलाला जेव्हा त्याची लाईफच हिरो बनवते, तेव्हा नक्की काय होते हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

'सातारचा सलमान' या चित्रपटाचा टिझर प्रदर्शित

लेखक-दिग्दर्शक हेमंत ढोमेचा ‘सातारचा सलमान’ हा चित्रपट लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. दिग्दर्शक हेमंत ढोमे, निर्माते प्रकाश सिंघी आणि सुयोग गोऱ्हे यांनी गणेशगल्लीच्या राजाचे दर्शन आणि आशीर्वाद घेत चित्रपटाचा टीझर प्रदर्शित केला. सुयोग गोऱ्हेची प्रमुख भूमिका असलेल्या ‘सातारचा सलमान’ या चित्रपटाचे पोस्टर आणि हटके नाव यामुळे चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा टीझर हा निव्वळ सुयोगवर केंद्रित आहे. ‘ए हिरो’ हाकेवर सुयोगची होणारी दमदार एण्ट्री आणि पडद्यामागून येणारा आवाज मनाला भिडणारा आहे. सुयोगची वेगवेगळी रूपं या टीझरमध्ये पाहायला मिळतात. स्वप्न बघणाऱ्या आणि छोट्या गावातून येणाऱ्या एका सामान्य मुलाला जेव्हा त्याची लाईफच हिरो बनवते, तेव्हा नक्की काय होते हे या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे.

याशिवाय या टीझरमध्ये अजून एक सुखद धक्का देणारी गोष्ट आहे. टीझर सुरु झाल्यावर ऐकू येणारा आवाज ओळखीचा वाटतोय ना? तर हा आवाज आहे अभिनेता अमेय वाघचा. अमेय वाघने देखील त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट वरून ‘सातारचा सलमान’ चित्रपटाचा टीझर शेअर करत चित्रपटाला आणि संपूर्ण टीमला शुभेच्छा दिल्या आहेत.

टेक्सास स्टुडियोजचे प्रकाश सिंघी निर्मित आणि हेमंत ढोमे दिग्दर्शित ‘सातारचा सलमान’ हा आगामी चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहमीच आपल्या वेगवेगळ्या कलाकृतीत प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱ्या हेमंत ढोमे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 9, 2019 4:52 pm

Web Title: satarcha salman trailer released hemant dhome suyog gorhe marathi movie ssv 92
Next Stories
1 विसर्जनानंतर चौपाट्यांचे हाल; सोनाली बेंद्रेनं व्यक्त केली चिंता
2 …म्हणून सुशांत सारा अली खानसोबत करणार नाही काम
3 दिग्दर्शकाच्या विनंतीनंतरही ‘साहो’च्या कमाईत कमालीची घसरण
Just Now!
X