News Flash

‘साथ दे तू मला’ मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांची पसंती

फेसबुक पेजवर शीर्षकगीताला १० लाखांहून जास्त व्ह्यूज

‘साथ दे तू मला’

स्टार प्रवाह वाहिनीवर सुरु झालेल्या ‘साथ दे तू मला’ या मालिकेला आणि मालिकेच्या शीर्षकगीताला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळताना दिसतोय. अवघ्या काही दिवसांत या मालिकेच्या शीर्षकगीताला १० लाखांहून जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. ‘स्टार प्रवाह’च्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवरुन हा व्हिडिओ दहा लाखांहून अधिक प्रेक्षकांनी पाहिलाय.

राहुल वैद्य आणि केतकी माटेगावकरने हे शीर्षकगीत गायलं असून सुप्रसिद्ध संगीतकार निलेश मोहरीरने या गाण्याला संगीत दिलं आहे. गीतकार श्रीपाद जोशींनी हे गाणं लिहिलंय.

या शीर्षकगीताला मिळणारा प्रतिसाद पाहून आनंद वाटत असल्याची भावना संगीतकार नीलेश मोहरीर यांनी व्यक्त केली. गायक, संगीतकार आणि गीतकारांसोबत मालिकेतले कलाकार आणि दिग्दर्शक यांचा सुद्धा या यशात मोलाचा वाटा आहे. या गाण्याच्या निमित्ताने छान भट्टी जमून आलीय. स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांनी माझ्यावर हा विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचे आभार अशी भावना निलेशने व्यक्त केली.

‘साथ दे तू मला’ या मालिकेच्या पुढील भागांमध्येही बऱ्याच इण्टरेस्टिंग घडामोडी पाहायला मिळणार आहेत. ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ७.३० वाजता स्टार प्रवाहवर प्रसारित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 5:23 pm

Web Title: sath de tu mala serial title song getting good views on social media
Next Stories
1 Video: आलियाने वरुणला केले ‘एप्रिल फूल’
2 ‘पीएम नरेंद्र मोदी’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा
3 सलमान-रणबीरमधील भांडण मिटणार?
Just Now!
X