News Flash

‘तेरे नाम’च्या दिग्दर्शकाचं मराठीत पदार्पण

त्यांच्या या चित्रपटातून कोकणातील एक प्रेमकथा प्रेक्षकांना पाहता येणार आहे

हिंदी चित्रपटसृष्टीतील नावाजलेलं नाव म्हणजे ज्येष्ठ अभिनेता व दिग्दर्शक सतीश कौशिक. अनेक लोकप्रिय चित्रपटाचं दिग्दर्शन केलेल्या सतीश कौशिक यांनी हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:चा एक स्वतंत्र ठसा उमटविला आहे. बॉलिवूडमध्ये यश मिळवल्यानंतर कौशिक आता मराठी चित्रपटसृष्टीकडे वळले आहेत. लवकरच ते एका मराठी चित्रपटाची निर्मिती करणार आहेत. यापूर्वी त्यांनी ‘तेरे नाम’, ‘हम आप के दिल में रहेते है’, ‘हमारा दिल आपके पास है’, ‘बधाई हो बधाई’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.

‘द सतीश कौशिक एंटरटेनमेंट प्रोडक्शन्स’ आणि ‘लोका एंटरटेनमेंट’ यांची निर्मिती असलेला ‘मन उधाण वारा’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून सतीश कौशल मराठी चित्रपटसृष्टीमध्ये पदार्पण करणार आहेत. कोकणच्या निसर्गरम्य पार्श्वभूमीवर अतिशय तरल आणि सुंदर प्रेमकथा या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या समोर येणार आहे.

संहिता व आशय या दोन गोष्टी मराठी चित्रपटाच्या बलस्थान राहिल्या आहेत. एक वेगळा दृष्टीकोन देणाऱ्या या मराठी चित्रपटाची निर्मिती आपण करावी असं मला वाटलं त्यातूनच ‘मन उधाण वारा’ ही हळवी प्रेमकथा मराठी रसिकांसाठी आणली आहे. ही प्रेमकथा असली तरी आयुष्याचे वेगवेगळे पदर यातून अनुभवायला मिळणार आहेत, असं सतीश कौशिक यांनी सांगितलं.

दरम्यान,निशांत कौशिक, अक्षय गडा, धवल गडा यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाची कथा प्रदीप कुरबा यांची असून पटकथा-संवाद सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर यांनी लिहिले आहेत. तर किशोर कदम, उत्तरा बावकर, सागर कारंडे, शर्वरी लोहकरे, मोनल गज्जर, रित्विज वैद्य, डॉ.शरद भुताडिया, विनोद कुलकर्णी, भारती पाटील, वैभव राजाध्यक्ष, साक्षी गांधी, ज्युलिया मोने, अनुराधा अटलेकर या कलाकारांच्या यात भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 22, 2019 1:36 pm

Web Title: satish kaushik to produce a marathi film ssj 93
Next Stories
1 Bigg Boss Marathi 2: ‘फिनाले’मध्ये पोहोचले हे दोन स्पर्धक
2 शाहरुख खानवर आली काम मागण्याची वेळ?
3 ‘द रॉक’च्या दुसऱ्या लग्नात बायकोने घातला लाखोंचा गाऊन, जाणून घ्या किंमत
Just Now!
X