आपला देश बहुतांशी गावांमध्ये वसतो. भली मोठी शहरे विकसित झाली असली तरी त्यांची पोटे गावांमुळेच भरली जातात. कारण आपल्या कृषीप्रधान देशातील तीन चतुर्थांश जनता शेती करते. शहरांमध्ये आयुष्य व्यतीत करणारे बरेचजण पहिला मौका मिळताच आपल्या गावी जातात, मनःशांती मिळवायला. खरंतर काँक्रीट जंगलामध्ये राहिल्यावर गावाकडच्या हिरवळीची ओढ अजूनच वाढते. त्यातच जे परदेशात स्थायिक झालेत त्यांना तर आपला देश, आपलं गाव नेहमीच खुणावत असतं. पालकांच्या डोळ्यात दिसणारे गावाचे प्रेम पाल्यांना नक्कीच गावाला भेट देण्यासाठी खुणावत असतं. अशाच एकाची गोष्ट ‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटातून सांगण्यात आली आहे.

हा चित्रपट एक सामाजिक संदेशही देऊ पाहतो. प्रवास करताना शक्यतो प्रत्येकालाच ‘सावधान, पुढे गाव आहे’ अशी पाटी दिसलीच असेल. पुढे गाव आहे की गाव पुढे आहे या शक्यतांचा विचार दिग्दर्शकाने प्रगल्भतेने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. या चित्रपटाच्या पोस्टरवर ‘सावधान, पुढे गाव आहे’ या पाटीवर गिधाड बसलेले दिसून येते. त्यामुळे चित्रपटाच्या विषयात गूढताही असण्याची शक्यता आहे.

rajkaran gela Mishit marathi movie on April 19 in theaters
‘राजकारण गेलं मिशीत’ १९ एप्रिलला चित्रपटगृहात
Marathi actor Ajinkya Deo play role in ranbir kapoor ramayan movie
अजिंक्य देव रणबीर कपूरच्या ‘या’ बहुचर्चित चित्रपटात झळकणार, व्यक्तिरेखेबाबत म्हणाले…
crew movie review by loksatta reshma raikwar
Crew Movie Review : रंजक सफर
artificial intelligence in indian movie
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भारतीय चित्रपट

वाचा : रोहित शेट्टीचे बॉक्स ऑफीस रेकॉर्ड्स

‘सावधान, पुढे गाव आहे’ या चित्रपटाचे दिग्दर्शन मुन्नावर शमीम भगत यांनी केले असून त्याची प्रस्तुती मीना शमीम फिल्म्सची आहे. चित्रपटातील कलाकारांची नावे येत्या काळात स्पष्ट होतीलच. ‘सावधान, पुढे गाव आहे’मध्ये रहस्य आणि उत्कंठा यांचे मिश्रण असणार असून लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.