02 December 2020

News Flash

‘सविता भाभी’ला लीगल नोटीस, ‘अश्लील उद्योग…’ चित्रपट वादात

वाचा नेमकं काय आहे प्रकरण

गेल्या काही दिवसापूर्वी पुण्यात ‘सविता भाभी’ची चांगलीच चर्चा रंगली होती. ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटाच्या टीमने हटके पद्धत वापरत चित्रपटाचं प्रमोशन केलं होतं. मात्र आता या चित्रपटातील सविता भाभी या कॉमिक कॅरेक्टरवरुन वाद निर्माण झाला आहे. निलेश गुप्ता यांनी हे पात्र कॉमिक कॉपीराइट असल्याचं सांगत चित्रपटाच्या टीमला कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

आलोक राजवाडे दिग्दर्शित ‘अश्लील उद्योग मित्र मंडळ’ या चित्रपटामध्ये अभिनेत्री सई ताम्हणकर मुख्य भूमिका वठवत असून ती सविता भाभी ही व्यक्तीरेखा साकारत आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्रसिद्धी करण्यासाठी चित्रपटाच्या टीमने पुण्यात ‘सविता भाभी… तू इथंच थांब!!’ असे होर्डिंग्ज लावले होते. या होर्डिग्सची चांगली चर्चाही रंगली होती. मात्र, याच दरम्यान निलेश गुप्ता यांनी कायदेशीर नोटीस पाठविली आहे.

चित्रपटातील पात्र हे कॉमिक कॉपीराइट असताना त्याबद्दल कोणतीही परवानगी घेण्यात आली नाही, असं म्हणतं त्यांनी कायदेशीर नोटीस बजावली आहे. या चित्रपटासमोर नवीन अडचण उभी राहिली आहे. येत्या ६ मार्च रोजी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. या चित्रपटात सईसोबत अभिनेता अमेय वाघ मुख्य भूमिकेत झळकणार आहे.

दरम्यान, या पूर्वीदेखील ‘दादा एक गुड न्यूज आहे’, असं होर्डिंग्ज लावून अभिनेत्री प्रिया बापटने तिच्या नाटकाचं प्रमोशन केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 26, 2020 10:45 am

Web Title: savitabhabhi hoarding dispute reached in court notice to ashleel udyog mitra mandal ssj 93
Next Stories
1 Video : सनी लिओनीच्या पाठीला गंभीर दुखापत?
2 इव्हान्काच्या सौंदर्याला ‘या’ बॉलिवूडच्या मेकअप आर्टिस्टचा टच!
3 हॅरी पॉटर पडला ‘या’ बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात; दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
Just Now!
X