शहर असो अथवा गाव चित्रपट बघण्याचं वेड सर्वांनाच कमी-अधिक प्रमाणात असतं. आपल्या आवडत्या कलाकारांना पाहण्यासाठी काही चाहते जीवाचं रान करतात. शहरात चित्रपट बघण्यासाठी थेटर,मिनी थिएटर यांची सोय असते. मात्र गावात ही सोय नसल्यामुळे गावातील प्रेक्षकांची गैरसोय होते. मात्र ही गैरसोय लक्षात घेता देवगडमध्ये एक नवी संकल्पना उदयाला आली आहे आणि याची माहिती अभिनेत्री अमृता खानविलकरने ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वांची लाडकी अभिनेत्री अमृता खानविलकरने आतापर्यंत आपल्या नृत्याच्या जोरावर अनेकांची मन जिंकली असून सध्या तिने आपल्या कोकणातील चाहत्यांसाठी आनंदाची बातमी दिली आहे. देवगडमध्ये मिनी कंटेनर थिएटरमुळे सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे देवगडवासीयांना मिनी थिएटरमध्ये चित्रपट बघण्याचा आनंद लूटता येणार आहे.
कंटेनरमधून सामान्यत: अवजड सामानाची वाहतूक करतांना पहायला मिळते. मात्र आता कंटेनरमध्ये मिनी थिएटर उभारण्यात आले आहे. आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून देवगड येथे कंटेनरमध्ये पहिले मिनी थिएटर उभारण्यात आले असून आता यामध्ये सामानाऐवजी प्रेक्षकांची रेलचेल दिसून येणार आहे.

देशात पहिलेच असे मिनी कंटेनर थिएटर असणार असल्याचे यावेळी अमृताने सांगितले आहे. या थिएटरची बातमी आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर पोस्ट केली होती. हिच बातमी आपल्या चाहत्यांना मिळावी यासाठी अमृताने नितेश राणे यांची पोस्ट शेअर केली आहे. एवढेच नाही तर या कार्यासाठी तिने नितेश राणे यांना धन्यवादही दिले आहेत.

 

वाचा :सोनम-आनंदच्या लग्नात असे येणार व-हाडी !

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Saw the mini theater in the container
First published on: 04-05-2018 at 14:06 IST