21 September 2020

News Flash

Video : दाक्षिणात्य चाहत्यांसाठी मराठमोळ्या सावनी रविंद्रची ‘रोमँण्टीक’ भेट

अनेक दाक्षिणात्य चित्रपटांमधील गाण्यांना सावनीचा आवाज लाभला आहे.

सावनी रविंद्र

आपल्या सुरेल आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी गायिका म्हणजे सावनी रविंद्र. सावनीने आतापर्यंत अनेक गाण्याने श्रोत्यांची मन जिंकून घेतली आहेत. त्यामुळे आज ती प्रत्येक मराठी श्रोत्याच्या मनावर राज्य करते. मराठी चित्रपटसृष्टीत नशीब आजमावल्यानंतर सावनीने तिचा मोर्चा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीकडे वळविला आहे. व्हॉलेंटाईनच्या या महिन्यात सावनीने आपल्या चाहत्यांसाठी एक सुरेल रोमँण्टीक गीताची भेट दिली आहे.

सावनीने मराठीप्रमाणेच दाक्षिणात्य चित्रपटामध्येही आपला सुरेल आवाज दिला आहे. ‘ईमाई’, ‘कुटाल’ हे तिचे गाजलेले दाक्षिणात्य चित्रपट असून ‘वेनिलाविन सलाईगल्ली’ ‘कत्रिल इधगळ’,’उईरे उईरे’ यामध्ये देखील सावनीने तिचा स्वरसाज चढविली आहे. मात्र सावनीने तामिळ भाषेत एखादं रोमँण्टीक गाणं म्हणावं अशी तिच्या दाक्षिणात्य चाहत्यांची इच्छा होती. या इच्छेखातर सावनीने ‘सावनी ओरिजनल्स’ या तिच्या सीरिजमध्ये ‘नाना सोल्लव्वा’ हे दाक्षिणात्य रोमँण्टीक गाणं म्हटलं आहे. नाना सोल्लव्वा या तमिळ शब्दांचा अर्थ ‘तूला एक सांगू का’ असा आहे.

सतिशकांतने लिहिलेल्या या रोमँण्टिक गीताला शुभंकर शेंबेकरने संगीत दिले आहे. आणि सावनी रविंद्रसोबत गायलेही आहे. ‘सावनी ओरिजनल्स’ सीरिजमधील हे पहिलेच गाणे आहे.

‘दक्षिणेकडे माझे बरेच चाहते असून मी त्यांच्यासाठी तामिळ भाषेत एखादं रोमँण्टीक गाणं सादर करावं अशी त्यांची इच्छा होती. या इच्छेखातर मी हे गाणं गायलं आहे. मुख्य म्हणजे या गाण्याचे संगीत नियोजन चैन्नईमधल्या म्युझिशियननी केल्याने गाणं खूप अस्सल तमिळ मातीतलं वाटतंय. चित्रीकरणही गाण्याला साजेसेच करण्यात आलंय. तमिळ आणि मराठी कानसेनांच्या गाण्यांविषयीच्या आवडींमध्ये साम्य असतं असं मला वाटतं. त्यामुळे हे सुमधूर गीत मराठी रसिकांनाही आवडेल असा मला विश्वास आहे’, असं सावनी म्हणाली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2019 10:00 am

Web Title: sawani ravindra valentines month romantic song
Next Stories
1 Happy Birthday Abhishek : ‘या’ ८ चित्रपटातून अभिषेकने दाखविली अभिनयाची चुणूक
2 ‘अभिनयाच्या क्षेत्रातील ‘कमांडर’ हरपला’, ट्विटवरून सेलिब्रिटीजने रमेश भाटकरांना वाहिली श्रद्धांजली
3 ‘या’ मालिकांमुळे रमेश भाटकरांचा चेहरा घराघरात पोहचला
Just Now!
X