मंगळवारी संध्याकाळी देशातील सर्वात मोठ्या चित्रपट पारितोषिक वितरण समारंभ ‘स्क्रीन अवॉर्डस २०१४’साठी तमाम बॉलिवूड सज्ज झाले. या पुरस्कार वितरण समारंभाच्या तयारीचा सोपस्कर उरकण्यात आला असून, मुंबईमध्ये ‘स्क्रीन पुरस्कार २०१४’साठी नामांकन पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
स्क्रीन पुरस्कारांच्या नामांकनाच्या पार्टीत इरफान, रिचा चढ्ढा, श्रध्दा कपूर आणि अन्य – भाग १
जुहूच्या जेडब्ल्यू मॅरिऑट हॉटेलमध्ये नामांकनाच्या पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. या पार्टीमध्ये नीरज कबीने सर्वप्रथम हजेरी लावली. त्यानंतर ‘लंच बॉक्स’ चित्रपटाची टीम इरफान खान, निमरत कौर आणि नवाजउद्दीन सिद्दीकी सोबत अवतरली. ‘शाहिद’ आणि ‘काय पो चे’ फेम राजकुमार राव याने या चित्रपटांचे दिग्दर्शक हंसल मेहता व अभिषेक कपूर यांच्यासोबत टेबल शेअर केला. राजकुमार राव याचा ‘काय पो चे’ चित्रपटामधील सहकलाकार अमित साध हा देखील यावेळी त्यांच्यासोबत होता. रिचा चढ्ढा तिच्या ‘फुकरे’ चित्रपटाचे दिग्दर्शक मृगदीप सिंग लांबा यांच्यासोबत पार्टीसाठी आली होती. दरम्यान, चित्रपट निर्माते राकेश ओमप्रकाश मेहरा व दिव्या दत्ता यांनी ‘भाग मिल्खा भाग’ चित्रपटाचे प्रतिनिधीत्व केले.
स्क्रीन पुरस्कारांच्या नामांकनाच्या पार्टीत इरफान, रिचा चढ्ढा, श्रध्दा कपूर आणि अन्य – भाग २
पार्टीचे सुत्रसंचालन दुरचित्रवाणी अभिनेता करणवीर बोरा याने केले. करणवीरने सर्वप्रथम ‘स्क्रीन’च्या संपादक प्रियांका सिन्हा झा व ‘लाईफ ऑके’चे कार्यकारी व्यवस्थापक अजित ठाकूर यांना व्यासपीठावर निमंत्रीत केले. ” डिसेंबरमध्ये आम्ही दोन वर्षे पूर्ण केल्याचे औचित्य पहिल्यांदाच स्क्रीन पुरस्कारांच्या सहकार्याने बॉलिवूडसोबत साजरे करण्याचा निर्णय घेतला.” असे ठाकूर म्हणाले.
‘स्क्रीन पुरस्कार २०१४’साठी नामांकन            
त्यानंतर ‘स्क्रीन’च्या संपादक प्रियांका सिन्हा झा व ‘लाईफ ऑके’चे कार्यकारी व्यवस्थापक अजित ठाकूर यांनी उपस्थितांना हिंदी चित्रपट निवड समितीची ओळख करून दिली. या समितीमध्ये होमी अदजानिया, मौसमी चटर्जी, जॉहन मॅथ्यू मथान, श्रीराम राघवण, अतुल अग्निहोत्री, सोनाली कुलकर्णी, उमेश शुक्ला, प्रोसेनजित आणि राहुल ढोलकीया हे सर्व दिग्गज होते. मराठी चित्रपट निवड समितीमध्ये किरण शांताराम यांच्यासह श्रेयश तळपदे आणि सुकन्या कुलकर्णी हे दोघे होते.
‘स्क्रीन पुरस्कार २०१४’चे वितरण १४ जानेवारीला होणार असून, या कार्यक्रमाचा होस्ट शाहरूख खान आहे. पुरस्कार वितरण समारंभात दीपिका पदुकोण चार अवतारांमधून दिसणार आहे.