‘जेम्स बॉण्ड’ हा सिनेसृष्टीतील आजवरचा सर्वोत्कृष्ट डिटेक्टिव्ह म्हणून ओळखला जातो. जबरदस्त अॅक्शन आणि अनोख्या स्टाईलमुळे गेली सहा दशकं ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. जेम्स बॉण्ड इतका लोकप्रिय आहे की त्याने वापरलेल्या वस्तुंना लंडनमधील एका खास संग्रहालयात ठेवलं जातं. अनेकदा चाहत्यांच्या आग्रहास्तव या वस्तुंचा लिलाव देखील केला जातो. विशेष म्हणजे या वस्तु कोट्यवधी रुपयांना विकल्या जातात.

अवश्य पाहा – VJ ते प्रसिद्ध अभिनेत्री; ७ वर्षात यशाच्या शिखरावर पोहोचणाऱ्या चित्राची आत्महत्या

अलिकडेच जेम्स बॉण्ड चित्रपटांमध्ये वापरल्या गेलेल्या एका पिस्तुलाचा लिलाव करण्यात आला. जूलियन ऑक्शनने दिलेल्या माहितीनुसार हे पिस्तुल १९६२ साली सॅन कॉनरी यांनी ‘डॉक्टर नो’ या चित्रपटात वापरलं होतं. बॉण्ड फ्रेंचाईजीमधील हा पहिला चित्रपट होता. लक्षवेधी बाब म्हणजे हे पिस्तुल २ लाख ५६ हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच जवळपास १ कोटी ९० लाख रुपयांना विकलं गेलं.

अवश्य पाहा – Forbes List 2020: सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत बॉलिवूडचाच दबदबा

अवश्य पाहा – करोना आणि क्षयरोग यांच्यात काय फरक आहे?

सॅन कॉनरी यांनी या पिस्तुलाला बॉण्ड शॉट्स असं नाव दिलं होतं. कॉनरी यांचा मित्र ख्रिस्तोफर वूड यांनी या पिस्तुलाची निर्मिती केली होती. त्या काळात चित्रपटांमध्ये वजनदार पिस्तुलांचा ट्रेंड होता. याच्या बरोबर उलट वूड यांनी एका हकल्या पिस्तुलाची निर्मिती केली होती. हे पिस्तुल पकडून स्टंट करणं सोपं जात होतं. त्यामुळे हे त्यांचं आवडतं पिस्तुल होतं. त्यांनी आपल्या करिअरमध्ये एकूण सात बॉण्डपटांमध्ये काम केलं. अन् या सातही चित्रपटात त्यांनी या पिस्तुलाचा वापर केलेला आहे. या पार्श्वभूमीवर हे लहानसं पिस्तुल कोट्यवधी रुपयांना विकलं गेलं.