Advertisement

राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला मोठा दिलासा

शिल्पा शेट्टी आणि तिचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा यांच्याविरोधात न्यायालयीन कार्यवाही निकाली काढण्यात आली आहे

बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा यांच्यासमोर गेल्या काही दिवसांपासून अडचणींचा डोंगर उभा राहिला आहे. मात्र अश्लिल चित्रपट निर्मितीप्रकरणी मुंबई पोलिसांच्या ताब्यात असलेल्या राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टीला थोडासा दिलासा मिळाला आहे. सेबीने शिल्पा शेट्टीला ३ लाखांचा दंड ठोठावला होता. ट्रेडिंग नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली होती. राज कुंद्रा, शिल्पा शेट्टी, रिपु कुंद्रा आणि त्यांची कंपनी वियान इंडस्ट्रीजवर सेबीच्या नियमांच उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता.

‘सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया’ने शिल्पा शेट्टी आणि तिचे पती आणि व्यापारी राज कुंद्रा यांच्याविरोधात न्यायालयीन कार्यवाही निकाली काढली आहे. काही दिवसांपूर्वी सेबीने वियान इंडस्ट्रीजला तीन लाख रुपयांचा दंड ठोठावला होता. इनसाइडर ट्रेडिंग नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल दंड आकारण्यात आला. आता सेबीने ही तक्रार मागे घेतली आहे.

सेबीने आपल्या आदेशात नमूद केले आहे की, प्राधान्य वाटपात शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांचा एकत्रित वाटा ०.०२ टक्के होता आणि त्यांच्या शेअर्सच्या वैयक्तिक अधिग्रहणाच्या संदर्भात पाहिले असता ते बदलून ०.०१ टक्के झाले आहे. नियामकानुसार, प्राधान्य वाटपानंतर त्यांच्या शेअर होल्डिंगमध्ये बदल नियमांनुसार निर्धारित मर्यादेत आहे आणि शेअर होल्डिंगमध्ये हा बदल त्यांच्याकडून कोणत्याही प्रकटीकरणाची हमी देत ​​नाही. नियामकाने २६ एप्रिल २०२१ रोजी रिपू ​​सुदान उर्फ ​​राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी कुंद्रा यांच्याविरूद्ध एससीएनने जारी केलेल्या नोटिसींविरोधात सुरू केलेल्या न्यायालयीन कारवाईचा पूर्ण केली आहे.

23
READ IN APP
X
X