01 March 2021

News Flash

काय म्हणतेय प्रसाद ओकची बायको..पाहिलंत का?

फोटो पोस्ट करत मिश्कील शैलीत दिल्या शुभेच्छा

अभिनेता प्रसाद ओक मराठीतला एक हरहुन्नरी कलाकार आहे. अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि गायनाच्या क्षेत्रातही त्यानं यश मिळवलं आहे. आज त्याचा वाढदिवस. या निमित्त अनेक कलाकारांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. प्रसादची पत्नी मंजिरी ओक हिनेही प्रसादसोबतचे फोटो पोस्ट करत त्याला अनोख्या पद्धतीनं शुभेच्छा दिल्या आहेत. मंजिरीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एका मिश्किल कॅप्शनसह त्या दोघांचे फोटो शेअर केले आहेत.

“तर प्रसाद, रितिरिवाजाप्रमाणे आज तुझ्याविषयी छान छान बोलायला हवं म्हणून हं फक्त… तर तू अत्यंत नम्र, अत्यंत सात्विक, निर्व्यसनी, खूपच हम्बल आहेस, तुझी वाणी फारच मधुर आहे, तू अत्यंत सच्चा माणूस आहेस… तुझी नजर एकदा एका गोष्टीवर पडली की तू ती मिळवतोसच. थोडक्यात काय तर अनेकांच्या मते तू एक देवमाणूस आणि सच्चा आहेस. त्या अनेकांच्या वतीने तुला सॅल्युट…तू तुझ्या कामाशी, अभिनयाशी, अत्यंत प्रामाणिक आहेस, नम्र आहेस, येस्स, तुला तुझ्या कामाची नशा आहे, तू मधुर गळ्याचा गायक आहेस, ऍज ए डिरेक्टर तू तुझ्या सहकाऱ्यांशी हम्बल आहेस (अर्थात मी सोडून), तू अभिनेता म्हणून अत्यंत सच्चा आहेस, खूप एकाग्र होऊन काम करतोस, थोडक्यात माझ्यासाठी तू प्रचंड प्रामाणिक अभिनेता, पॅशनेट दिग्दर्शक आणि माझा बेस्ट फ्रेंड आहेस… बस झालं यार… खूप कौतुक केलं… सेट वर काम सोडून मी वेळ घालवला तर माझा दिग्दर्शक मला खूप ओरडतो. हॅप्पी बर्थडे प्रसाद. देव तुला उदंड यश, निरोगी आयुष्य, आणि सुख समाधान देवो” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. त्यावर प्रसादनेही आपल्या अंदाजात प्रतिक्रिया दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by manjiri oak (@manjiri_oak)

तिची शुभेच्छा देण्याची ही पद्धत चाहत्यांनाही पसंत पडली. प्रसादच्या चाहत्यांनीही वाढदिवसानिमित्त त्याच्यावर आणि अशा भारी कॅप्शनसाठी मंजिरीवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. अभिनेत्री अमृता खानविलकरनेही मंजिरीच्या पोस्टवर “क्या बात है मंजिरी, प्रसाद लकी आहे की तो तुझ्यासोबत आहे”, अशा आशयाची कमेंट केली आहे.

प्रसाद सध्या चंद्रमुखी या आपल्या आगामी चित्रपटाच्या दिग्दर्शनात व्यस्त आहे. त्याने दिग्दर्शित केलेला २०१९चा हिरकणी हा चित्रपट बराच गाजला. तसंच महाराष्ट्राची हास्यजत्रा या कार्यक्रमात तो परिक्षक म्हणून काम करत आहे. प्रसाद आणि मंजिरीला सार्थक आणि मयंक अशी दोन मुलं आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 4:45 pm

Web Title: see what prasad oaks wife is saying vk98
Next Stories
1 मी भारती सिंह किंवा कपिल शर्मा नव्हे; नेहा पेंडसेचं ट्रोलर्सना उत्तर
2 मोनोकिनीमधील फोटो शेअर केल्यामुळे अंकिता झाली ट्रोल
3 सखी-सिद्धार्थचा ‘बेफाम’ स्वॅग; पाहा व्हिडीओ
Just Now!
X