नसरुद्दीन शाह हे बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेते म्हणून ओळखले जातात. अलिकडेच त्यांचा ‘राम प्रसाद की तेरहवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. लक्षवेधी बाब म्हणजे मुकेश अंबानी यांच्या जियो स्टुडिओज या बॅनरखाली तयार झालेला हा वर्षातील पहिलाच चित्रपट होता. मात्र अनेक अष्टपैलू कलाकार असतानाही हा चित्रपट सुपरफ्लॉप ठरला. दरम्यान या चित्रपटाच्या अपयशाचं खापर दिग्दर्शिका सीमा पाहवा यांच्यावर फोडण्यात आलं. मात्र त्यांनी देखील हा सलमान खानचा चित्रपट नव्हता, असं म्हणत टीकाकारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं.

सीमा पाहवा या प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘राम प्रसाद की तेरहवी’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण केलं. अलिकडेच अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी या चित्रपटावर भाष्य केलं. त्या म्हणाल्या, “हा चित्रपट अत्यंत सुंदर आहे. एकत्र कुटुंबात घडणाऱ्या गंमती जंमती या चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत. संपूर्ण कुटुंब या चित्रपटाचा आनंद घेऊ शकतं. समिक्षकांनी देखील या चित्रपटाच्या संकल्पनेची स्तुती केली आहे. परंतु आम्ही चित्रपटाची जाहिरात करण्यात कमी पडलो. मुळातच लो बजेट चित्रपट त्यात करोनाच्या संक्रमणामुळे आम्हाला अपेक्षित जाहिरातबाजी करता आली नाही. परिणामी इतर बिग बजेट चित्रपटांच्या तुलनेत हा चित्रपट काहीसा मागे राहिला. परंतु टीकाकारांनी कृपया या चित्रपटाची तुलना सलमान खानच्या चित्रपटांशी करु नये. अशी विनंती त्यांनी टीकाकारांना केली.”

२१ वर्षांपूर्वी प्रियांका दिसायची अशी; पाहा देसी गर्लचं पहिलं फोटोशूट

‘राम प्रसाद की तेरहवी’ हा एक कौटुंबिक विनोदीपट आहे. या चित्रपटात नसरुद्दीन शाह यांच्यासोबत सुप्रिया पाठक, मनोज पाहवा, कोंकना सेन, विक्रांत मेस्सी यांसारख्या अनेक नामांकित कलाकारांनी भूमिका साकारल्या आहेत. मात्र तरी देखील चित्रपटाला केवळ २५ लाख रुपयांची कमाई करता आली. परिणामी चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला असं म्हटलं जात आहे.