News Flash

नील नितीन मुकेशची कुंचल्यावरही कलाकारी

एखाद्या चित्रपटाची तयारी करताना अनेक दिग्दर्शक त्या चित्रपटातील प्रसंगांचे कागदावर रेखाटन करतात. त्यामुळे दिग्दर्शन करताना खूप सोपे जाते, असे म्हणतात. पण एखाद्या कलाकाराने आपल्या भूमिकेचा

| May 23, 2013 12:46 pm

नील नितीन मुकेशची कुंचल्यावरही कलाकारी

एखाद्या चित्रपटाची तयारी करताना अनेक दिग्दर्शक त्या चित्रपटातील प्रसंगांचे कागदावर रेखाटन करतात. त्यामुळे दिग्दर्शन करताना खूप सोपे जाते, असे म्हणतात. पण एखाद्या कलाकाराने आपल्या भूमिकेचा आणि लूकचा विचार करताना रेखाटन करून ठरवणे, ही गोष्ट क्वचितच घडते. बॉलिवूडमध्ये आतापर्यंत अत्यंत हटके आणि अपवादात्मक भूमिका करणारा नील नितीन मुकेश हा तरुण अभिनेता मात्र ही गोष्ट अगदी ठरवून करतो. नील स्वत: एक चांगला चित्रकार आहे. आपल्यातल्या या कलेचा उपयोग तो चित्रपटातील आपल्या भूमिकेचा लूक निश्चित करताना करत असतो.
नीलच्या बाबतीतील ही गोष्ट ‘शॉर्टकट रोमियो’ या चित्रपटाच्या निमित्ताने लक्षात आली. दिग्दर्शक सुसी गणेशनला या चित्रपटात नीलने केस वाढवलेले हवे होते. त्यानुसार त्याने नीलला त्याच्या भूमिकेची आणि लूकची संपूर्ण माहिती दिली. केस वाढवलेल्या स्थितीत आपण कसे दिसू, हे नीलला आधीच पाहायचे होते. त्यामुळे त्याने केस वाढवलेल्या स्थितीतील आपली चित्रे आधी रेखाटली. मात्र नीलने सुसी गणेशनसमोर एक अट ठेवली होती. नीलच्या मते केसांचा टोप लावून काम करण्यापेक्षा केस वाढवून काम करणे जास्त वास्तवदर्शी वाटले असते. त्यामुळे त्याने केस वाढवायला सुरुवात केली.
बऱ्याच मेहेनतीनंतर आणि कालावधीनंतर केस वाढवलेल्या लूकमध्ये नील समोर आला, त्या वेळी दिग्दर्शक सुसी गणेशनसह सगळ्यांनाच त्याचा हा लूक बेहद्द आवडला. नीलच्या मते स्केच काढल्यामुळे कॅरेक्टरच्या उभारणीला मदत मिळते. आता नीलचा कित्ता गिरवत सलमान, आमीरही स्वत:ची स्केचेस काढणार आहेत, असे ऐकिवात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 23, 2013 12:46 pm

Web Title: self sketches by neel nitin mukesh
टॅग : Entertainment
Next Stories
1 ऐश्वर्या मॅडोनासह घेणार लंडन संगीत समारंभात सहभाग
2 इथे तारेही फसतात..
3 चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान अक्षय कुमारला दुखापत
Just Now!
X