15 August 2020

News Flash

कंगना मला मारहाण आणि काळी जादू करायची, माजी प्रियकराचा धक्कादायक खुलासा

कंगना त्याच्यासोबत कशी वागली, याचा पाढाच अध्ययनने वाचला आहे.

Kangana Ranaut & Ex Boyfriend Adhyayan Suman

अभिनेता ह्रतिक रोशनविरुद्धच्या वादामुळे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या कंगना रणौत आता आणखी गोत्यात येण्याची शक्यता आहे. कंगनाचा माजी प्रियकर अध्ययन सुमन याने कंगनासंदर्भात काही धक्कादायक खुलासे करून एकच खळबळ उडवून दिली आहे. मीदेखील ह्रतिकसारख्या परिस्थितीतून गेल्याचे त्याने म्हटले आहे. अध्ययन सुमनसोबत काही काळ कंगनाचे अफेअर राहिले आहे. या काळात कंगना त्याच्यासोबत कशी वागली, याचा पाढाच अध्ययनने वाचला आहे. कंगना मला मारहाण करायची, माझ्यावर काळी जादू करायची. ‘राज २ ‘या चित्रपटात अध्ययन आणि कंगना यांनी एकत्र काम केले आहे. दोघांचे वर्षभर अफेअर होते, मात्र नंतर ब्रेकअप झाले. त्यानंतर अध्ययन देश सोडून निघून गेला. काही वर्षांनी तो परतला आहे. ‘राज २’ या चित्रपटात काम केल्यानंतर महेश भट यांनी मला बोलावून माझ्या कामाचे कौतूक केले होते. त्यावेळी मलाच कोणी बोलवत नाही, असे उद्गार काढत कंगनाने अपशब्द उच्चारल्याचे अध्ययनने सांगितले. त्यावेळी मला प्रचंड धक्का बसल्याचे त्याने म्हटले. याशिवाय, कंगना माझ्यावर काळी जादू करत असल्याचाही दावा अध्ययनने केला. कंगनाला ‘फॅशन’ चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्याचवेळी माझ्या वडिलांनी मला बीएमडब्ल्यू कार भेट दिली होती. ही गोष्ट मी कंगनाला सांगितली तेव्हा, कार भेट द्यायला तू आयुष्यात काय केलेस, असे विचारत कंगनाने माझा अपमान केल्याचेही अध्ययनने सांगितले. याशिवाय, ह्रतिक रोशनच्या वाढदिवसाच्या पार्टीत कंगनाने आपल्याला कानाखाली मारल्याचा दावाही अध्ययनने केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 28, 2016 3:29 pm

Web Title: sensational revelations made by kangana ranaut ex boyfriend adhyayan suman
Next Stories
1 ‘काबिल’ या चित्रपटासाठी हृतिक रोशन घेणार अंध व्यक्तींची भेट
2 TE3N मधील अमिताभ, नवाजुद्दीन आणि विद्या बालनचा फर्स्ट लूक
3 हेमामालिनी यांनी दीपिकाला दिल्या साखरपुड्याच्या शुभेच्छा
Just Now!
X