शाळांमध्ये सेक्स एज्युकेशन अर्थात लैंगिक शिक्षण हा विषय अनिवार्य केला गेला पाहिजे अशी मागणी अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाने केली आहे. ‘खानदानी शफाखाना’ हा सोनाक्षी सिन्हाचा सिनेमा ऑगस्ट महिन्यात प्रदर्शित होतो आहे. या सिनेमात सेक्स या विषयाला धरुन कसे गैरसमजच असतात किंवा अनेकदा या विषयावर बोलणं आपण कसं टाळतो. या सगळ्यावर विनोदी अंगाने भाष्य करण्यात आलं आहे.

आपण स्वतःला सुधारणावादी समजतो, पुढारलेले समजतो मात्र सेक्स हा विषय आला की मग आपण पुराणमतवादी होतो. हा विषय न बोलण्याचा आहे यावर बोलायला नकोच असे समजतो. संकोच करतो.. सोनाक्षी सिन्हाचा ‘खानदानी शफाखाना’ हा सिनेमाही याच जुनाट मतांवर भाष्य करणारा आहे. याच सिनेमाबाबत बोलताना सोनाक्षी सिन्हाने लैंगिक शिक्षण शाळांमध्ये देणं गरजेचे असल्याचं म्हटलं आहे.

World Parkinson's Day 2024 Parkinson's disease Symptoms and causes
World Parkinson’s Day 2024 : कंपवाताच्या १० टक्के रुग्णांमध्ये आनुवंशिक कारणाने आजार; डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणतात…
Rohit Sharma Akash Ambani spotted together in a car video viral
IPL 2024: रोहित शर्मा आणि आकाश अंबानी एकाच कारमधून प्रवास करत असल्याचा व्हीडिओ व्हायरल, नव्या चर्चांना उधाण
economy of engineering sector marathi news
अर्थचक्राचे शिल्पकार – अभियांत्रिकी आणि भांडवली उद्योग क्षेत्र
mutual fund, multi cap fund
मल्टिकॅप फंड : त्रिवेणी संगम…

सोनाक्षी सिन्हाचा हा सिनेमा ऑगस्ट महिन्यात भेटीला येतो आहे. या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे त्याला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. आता या सिनेमाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो ते पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.