देशात उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधेच्या अभावामुळे समाजातील गरीब घरातील गर्भवती महिलांच्या मृत्यूत होणा-या वाढीबाबत चिंता व्यक्त करतांना प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमी म्हणाली, या महिलांच्या मृत्यूची दखल घेतली जात नाही.
‘रॉयल शांती हेल्थ केअर’ या खासगी रुग्णालयाच्या उदघाटन समारंभाच्या वोळी बोलताना शबाना म्हणाली, देशात वर्षभरात मृत्युमुखी पडणा-या गर्भवती महिलांची संख्या ४०० असून, ती विमान दुर्घटनेत मृत्युमुखी पडणा-या प्रवाशांच्या संख्येइतकी आहे. परंतु, समाजातील या गरीब वर्गातील महिलांच्या मृत्यूची दखल घेतली जात नाही.
गर्भवती महिलांच्या जीवनाच्या सुरक्षिततेसाठी संस्थात्मक प्रसुतीस महत्व देणे गरजेचे असून, देशात महिला आणि लहान मुलांचे आरोग्य आणि पोषणासाठी अजून खूप काही करण्यासारखे शिल्लक असल्याचे शबानाने सांगितले.