News Flash

करिनाच्या ‘फेव्हिकॉलसे’ गाण्यावर शबाना आझमी भडकल्या..

केवळ ‘प्रदर्शन’ इतकाच त्या गाण्यांचा उद्देश असतो.

करिनाच्या ‘फेव्हिकॉलसे’ गाण्यावर शबाना आझमी भडकल्या..

बॉलीवूडमधील हल्लीची गाणी किंवा आयटम साँग व त्यातील शब्द यांचा एकमेकांशी काही संबंध असतोच असे नाही. केवळ ‘प्रदर्शन’ इतकाच त्या गाण्यांचा उद्देश असतो. अशाच एका गाण्यावरून ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी भडकल्या आहेत. अभिनेत्री करिना कपूरच्या ‘फेव्हिकॉल’से या गाण्यावर त्यांनी तोफ डागली आहे.  ‘दबंग-२’ या चित्रपटातील करिना कपूरच्या ‘फेव्हिकॉल से’ या गाण्यावर शबाना आझमी यांनी आक्षेप घेतला आहे. जागतिक  ‘वूमन ऑफ वर्थ’ या उपक्रमाच्या निमित्ताने त्यांनी ‘आयटम साँग’ आपण नेहमीच विरोध केला असल्याचे सांगितले. जर एखादी अभिनेत्री ‘मै तंदुरी मुर्गी हू यार’ ‘गटका ले सय्या अल्कोहोल से’ असे काही म्हणत असेल तर ती गंभीर बाब आहे.  गाणे लिहिणारा एक जण असला ते तयार करणारे काही जण असले तरी ते गाणे पाहणारे हजारो, लाखो असतात. ज्यांना काहीही समजत नाही, अशी लहान मुलेही या अशा गाण्यांवर नाचतात, ती गाणी म्हणतात. हे थांबविण्याची जबाबदारी आपली सगळ्यांचीच आहे, असेही शबाना आझमी यांनी सुनावले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 13, 2016 6:32 am

Web Title: shabana azmi slams kareenas dabangg song fevicol se 2
टॅग : Shabana Azmi
Next Stories
1 संजय दत्तच्या पहिल्या पत्नीने मरण्यापूर्वी लिहलेले पत्र..
2 माझ्या मुलाचा सांभाळ मी एकटीच करतेय, मलायकाने सलमानला सुनावले
3 करिनाच्या गाण्यावर शबाना आझमी भडकल्या
Just Now!
X