मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर शनिवारी ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांच्या गाडीचा अपघात झाला. त्यात शबाना या जखमी झाल्या होत्या. त्यांना अंधेरी येथील कोकिलाबेन रुग्णालयात हलविण्यात आले होते. आता त्यांची प्रकृती स्थिर असून लवकरच त्यांना घरी पाठवण्यात येईल अशी माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली.
अभिनेते अनिल कपूर, तब्बू आणि अनेक कलाकारांनी त्यांची रुग्णालयात जाऊ न भेट घेतली. शबाना यांचे पती गीतकार जावेद अखतर यांनीही समाज माध्यमातून शबाना यांनी प्रकृती स्थिर असल्याचे कळवले. येत्या आठ दिवसात त्यांना घरी पाठवण्यात येईल.’ अशी माहिती कोकिलाबेन रुग्णालय प्रशासनाने दिली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 20, 2020 12:58 am