News Flash

शाहरूख आणि भन्साळी  पुन्हा एकत्र काम करणार

बाजीराव मस्तानी’ आणि  ‘पद्मावत’ चित्रपटासाठी त्याला विचारणा केली होती.

 

दोन दशकांपूर्वी ‘देवदास’ या सुपरहिट चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेता शाहरूख खान आणि दिग्दर्शक संजय लीला भन्साळी ही जोडगोळी एकत्र आली होती. मात्र त्या चित्रपटानंतर भन्साळींना शाहरूखबरोबर पुन्हा काम क रायची इच्छा असूनही ही जोडी कधी एकत्र आली नाही. आता इतक्या वर्षांनी भन्साळींनी शाहरूखसमोर एका चित्रपटाचा प्रस्ताव ठेवला असल्याचे समजते. ‘इजहार’ असे या चित्रपटाचे नाव असून भन्साळींनी शाहरूखसाठी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू के ले आहे. ‘देवदास’नंतर शाहरूखबरोबर काम करण्यासाठी भन्साळींनी अनेकदा प्रयत्न के ले. त्यांनी ‘बाजीराव मस्तानी’ आणि  ‘पद्मावत’ चित्रपटासाठी त्याला विचारणा केली होती. दोन्ही वेळा त्यांची बोलणी फिस्कटली आणि रणवीर सिंगला घेऊन भन्साळींनी दोन्ही चित्रपट के ले. सलमान आणि शाहरूख खानला एकत्र आणत ‘हम दिल दे चुके  सनम’च्या सिक्वलचाही त्यांनी घाट घातला होता, मात्र तोही कधी फळाला आला नाही. त्यानंतर सुप्रसिद्ध गीतकार साहिर लुधियानवी यांच्यावर चरित्रपट करायचा विचार भन्साळींच्या मनात होता, त्याची चरित्रपटासाठी शाहरूख हीच त्यांची पसंती होती. तोही प्रकल्प बारगळला आणि ही जोडी पुन्हा एकत्र येऊ शकली नाही. इतक्या वर्षांनंतर मात्र भन्साळींनी शाहरूखबरोबर काम करायचंच असा चंग बांधला आहे. सध्या भन्साळी ‘हीरा मंडी’ या वेबमालिके च्या निर्मितीत व्यग्र आहेत. अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाची यात मुख्य भूमिका आहे. या वेबमालिके नंतर भन्साळी यांच्या मनात राहून गेलेल्या आणखी एका प्रेमकथेवर ते काम सुरू करणार आहेत. ‘इजहार’ नावाने त्यांनी ही प्रेमकथा काही वर्षांपूर्वी शाहरूखसाठीच लिहिली होती. एका भारतीय तरुणाच्या वास्तव प्रेमकथेवर हा चित्रपट आधारित असल्याचे समजते. नॉर्वेत राहणाऱ्या आपल्या प्रेयसीला भेटण्यासाठी कित्येक मैल सायकलवरून प्रवास के लेल्या तरुणाची ही कथा आहे. आता भन्साळींनी पुन्हा एकदा या चित्रपटाच्या पटकथेवर काम सुरू के ले आहे. शाहरूखला ही पटकथा पसंत पडली तर लवकरच या चित्रपटाच्या चित्रीकरणाची तयारी सुरू होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 9, 2021 1:06 am

Web Title: shah rukh and bhansali will work together again akp 94
Next Stories
1 ‘समाजबदलातून कलाकृती घडतात’
2 कलाकारांचा कृतिपट
3 रणबीर कपूरची छायाचित्रकारांना तंबी
Just Now!
X