30 September 2020

News Flash

‘कॉफी विथ करण’ मधूनही फवादची गच्छंती..

करणच्या 'ऐ दिल है मुश्किल'मध्ये फवाद झळकणार आहे.

फवाद खानला चित्रपटात काम दिल्यामुळे सध्या करण जोहरला मनसेच्या विरोधाला सामोरे जावे लागत आहे.

करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शोने थोड्याच काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. त्यामुळे करण त्याच्या कॉफीसह पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर हजर होणार आहे. कार्यक्रमाची रुपरेषा पाहता पाकिस्तानी अभिनेता फवाद खान करणच्या या कार्यक्रमात गप्पा मारण्यासाठी येणार होता. पण उरी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बहुचर्चित ‘अल्टीमेटम’मुळे भारतातील पाकिस्तानी कलाकारांचे अस्तित्व धोक्यात आले आहे. याचेच पडसाद करणच्या ‘कॉफी विथ करण’ या कार्यक्रमावरही पडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता फवादऐवजी या कार्यक्रमामध्ये किंग खान हजेरी लावणार असल्याची चर्चा सध्या रंगत आहे. याविषयीची अधिकृत माहिती समोर आली नसली तरीही, करण त्याच्या कार्यक्रमाच्या सहाव्या पर्वाची सुरुवात करण्यासाठी शाहरुख खान आणि आलिया भट्टला बोलवणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे.

करणच्याच ‘धर्मा प्रॉडक्शन’ अंतर्गत बनलेल्या ‘कपूर अॅण्ड सन्स’ या चित्रपटामधील फवादचे काम पाहता करण त्याच्या कामावर भलताच भाळलेला दिसला. या चित्रपटानंतर करणच्या ‘ऐ दिल है मुश्किल’मध्येही फवाद झळकणार आहे. आता तर अशी चर्चाही होती की, करणने त्याच्या आगामी चित्रपटासाठी कतरिना कैफ सोबत फवाद खानलाही महत्त्वाच्या भूमिकेसाठी निवडले होते. पण एकंदर तणावाचे वातावरण आणि पाकिस्तानी कलाकारंना होणारा विरोध पाहता फवाद खान आणि इतर पाकिस्तानी कलाकारांना बी टाऊनमध्ये पाहण्याची संधी मिळणार की नाही, हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.

वाचा: हात जोडून सांगतो, आम्हाला एकटं सोडा- करण जोहर

दरम्यान सध्या करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाचीच प्रचंड चर्चा आहे. रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्यासह फवाद खानही या चित्रपटामध्ये एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. येत्या २८ ऑक्टोबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 26, 2016 4:45 pm

Web Title: shah rukh khan alia bhatt replace fawad khan as first guest on koffee with karan 5
Next Stories
1 द्रौपदीची व्यक्तिरेखा साकारण्याची रिचाची इच्छा
2 भारताविरुद्ध वर्णभेदी ट्विट करणा-या पाकिस्तानी अभिनेत्याला ब्रिटीश चॅनलने हाकललं
3 हृतिक आणि कंगनाबद्दलचे सत्य जाणून अनेकांना धक्काच बसेल- राकेश रोशन
Just Now!
X