News Flash

“आर्यन आणि न्यासा पळून गेले तर?”, शाहरुख आणि कजोलने दिले हे उत्तर

त्यांना कॉफी विथ करण या शोमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता.

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख आणि अभिनेत्री काजोल यांनी अनेक हिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे.’ या चित्रपटात शाहरुख आणि काजोलसोबत अमरीश पूरी, फरीदा जलाल, परमीत सिंह हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. आज या चित्रपटाला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत.

हिंदूस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, २००७मध्ये काजोल आणि शाहरुखने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शोमध्ये हजेरी लावली होती. तेव्हा त्यांना रॅपिड फायर राऊंडमध्ये काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यावर त्या दोघांनी भन्नाट उत्तरे दिली होती.

त्या प्रश्नांमधील एक प्रश्न काजोलला विचारण्यात आला होता तो म्हणजे जर तुझी मुलगी न्यासा शाहरुख खान आणि गौरी खानचा मुलगा आर्यन खानसोबत पळून गेली तर तुझी प्रतिक्रिया काय असेल?. त्यावर काजोलने मजेशीर उत्तर दिले आहे.

‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ असे काजोलने त्यावर म्हटले होते. त्यानंतर हा प्रश्न शाहरुखला विचारण्यात आला. त्यावर त्याने मला हा विनोदच कळाला नाही असे म्हटले आणि जर काजोल त्याची नातेवाईक झाली तर खूप घाबरेल असे त्याने पुढे म्हटले. काजोल आणि शाहरुखसोबत राणी मुखर्जी देखील तेथे उपस्थित होती. या दोघांची उत्तरे ऐकून तिला हसू अनावर झाले होते.

‘दिलवाले दुल्हनियाँ ले जाएंगे’ हा चित्रपट १९९५ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. शाहरुख आणि काजोलच्या जोडीने तर प्रेक्षकांची मने जिंकली होती. दिग्दर्शक आदित्य चोप्राने या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. तसेच त्याच्या या पहिल्याच चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2020 12:43 pm

Web Title: shah rukh khan and kajol had a savage reply when questioned about nysa devgn eloping with aryan khan avb 95
Next Stories
1 ‘दख्खनचा राजा ज्योतिबा’ मालिकेत समर्थ पाटील साकारणार ज्योतिबाचं बालरुप
2 लग्नात वडिलांना नवरदेवाच्या पोशाखात पाहिल्यावर अशी होती इब्राहिमची प्रतिक्रिया
3 सिनेमाचं सेलिब्रेशन! काजोल- शाहरुखनं सोशल हॅण्डलमध्ये केला ‘हा’ बदल
Just Now!
X