26 February 2021

News Flash

भन्साळींसाठी करण- अर्जुन एकत्र येणार?

आपल्या आगामी चित्रपटात सलमानसोबत शाहरुखनंही काम करावं या प्रयत्नात भन्साळी आहेत.

‘पद्मावत’ सिनेमाला मिळालेल्या भरभरून यशानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साळी आता आणखी एका मोठ्या चित्रपट निर्मितीच्या कामाला लागले आहे. रणवीरला डच्चू देत आगामी चित्रपटासाठी भन्साळींनी सलमानची निवड केली. विशेष म्हणजे ‘हम दिल दे चुके सनम’ नंतर बऱ्याच वर्षांनी सलमान भन्साळींसोबत काम करणार आहे त्यामुळे दोघांचेही चाहते उत्सुक आहेत. आता या चित्रपटात सलमानसोबत शाहरुखनंही काम करावं या प्रयत्नात भन्साळी आहेत.

शाहरूखनं जर या चित्रपटासाठी होकार दिला तर तब्बल १६ वर्षांनी ही जोडी पडद्यावर दिसणार आहे. यापूर्वी शेवटचं २००२ साली आलेल्या ‘हम तुम्हारे है समन’ चित्रपटात दोघांनी काम केलं होतं. भन्साळी यांचा चित्रपट दोन मित्रांच्या घट्ट मैत्रीवर आधारित असणार आहे. मैत्रीत कटुता आलेले दोन मित्र एकमेकांच्या जीवावर उठतात नंतर मात्र एकत्र येतात साधरण अशा कथेवर संजय लीला भन्साळींना चित्रपटाची निर्मिती करायची आहे असंही सुत्रांकडून समजत आहे.

सुभाष घई यांचा १९९१ मध्ये आलेला ‘सौदागर’ चित्रपटासारखीच कहाणी या चित्रपटाची असणार आहे. अद्यापही शाहरुखच्या नावावर शिक्कामोहर्तब व्हायचं आहे. मात्र रुपेरी पडद्यावर गाजलेली ही करण- अजुनची जोडी पाहण्यास चाहते खूपच उत्सुक आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2018 10:38 am

Web Title: shah rukh khan and salman khan will come together for sanjay leela bhansali film
Next Stories
1 नाटकांची कॉर्पोरेट नांदी
2 गृहितकांना झिरो करणारे वर्ष..
3 मराठीला ‘अच्छे दिन’
Just Now!
X