22 November 2019

News Flash

Ind vs Pak: महामुकाबला पाहण्यासाठी मुलासोबत शाहरुखने अशी केली तयारी

भारत विरुद्ध पाकिस्तानच्या या लढतीवर पावसाचे सावट असल्याने सगळ्यांच्याच मनात धाकधूक आहे.

शाहरुख खान, आर्यन खान

वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेत सर्वाधिक लक्ष ज्या लढतीवर केंद्रित असते त्या लढतीसाठी भारत आणि पाकिस्तानचे संघ आणि त्यांचे चाहते पूर्णपणे सज्ज आहेत. हा महामुकाबला पाहण्यासाठी सेलिब्रिटींनीही विशेष तयारी केली आहे. बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानने त्याच्या ट्विटर अकाऊंटवर एक फोटो पोस्ट केला आहे. मुलगा आर्यनसोबत शाहरुख हा सामना पाहणार असून दोघंही जर्सी परिधान करून बसले आहेत.

शाहरुखच्या जर्सीवर मुफसा तर आर्यनच्या जर्सीवर सिम्बा हे नाव पाहायला मिळत आहे. ‘द लायन किंग’ या अॅनिमेटेड चित्रपटातील पात्रांची ही नावं आहेत. ‘पितृदिनी भारत विरुद्ध पाकिस्तानचा महामुकाबला पाहण्यासाठी आम्ही दोघं सज्ज आहोत,’ असं म्हणत त्याने टीम इंडियाला शुभेच्छा दिल्या आहेत.

भारत विरुद्ध पाकिस्तानच्या या लढतीवर पावसाचे सावट असल्याने सगळ्यांच्याच मनात धाकधूक आहे. त्यामुळे सामना होणार का?, झाला तर किती षटकांचा होणार, हा प्रश्न सर्वांनाच पडला आहे. दरम्यान, वर्ल्डकपमध्ये आतापर्यंत ४ सामने पावसामुळे रद्द झाले आहेत. यात भारताचाही न्यूझीलंडविरुद्धचा सामना आहे.

First Published on June 16, 2019 1:59 pm

Web Title: shah rukh khan and son aryan khan are ready for india vs pakistan world cup match ssv 92
Just Now!
X