News Flash

ट्विटरवर शब्दांच्या खेळात उदयवर भारी पडला शाहरुख

अजूनही शाहरुखने उदयला शिकवणे सोडले नाही

शाहरुख खान आणि उदय चोप्रा

‘मोहब्बते’ सिनेमात शाहरुख त्याच्या शिष्यांना अनेक नवनवीन गोष्टी शिकवत असतो. त्याच्या तीन आवडत्या शिष्यांपैकी एक शिष्य म्हणजे उदय चोप्रा. पण आता असं दिसतंय की अजूनही शाहरुखने उदयला शिकवणे सोडले नाही. पण जर तुम्हाला वाटत असेल की शाहरुख त्याला अभिनयाची शिकवणी देत असेल पण तसे काही नाही. ते दोघंही एकमेकांसोबत ट्विटरवर शब्दांचा खेळ खेळत होते.

त्याचे झाले असे की, उदयने मध्यरात्री एक ट्विट केले. उदयचे हे ट्विट पाहून शाहरुखनेही एक ट्विट केले. शाहरुच्या ट्विटनंतर उदयने पुन्हा एकदा ट्विट केले. त्यांच्या या ट्विट संभाषणात उदयने असे एक ट्विट केले की त्याला शाहरुखचे ट्विट कळत नाहीये. शाहरुखच्या ट्विटमध्ये त्याने दोन नवीन शब्दांचा उपयोग केला होता. त्यातील एका शब्दाचा अर्थ समजून घेण्यासाठी मला गुगलची मदत घ्यावी लागेल.

दरम्यान, शाहरुख खानला मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठातर्फे मानद पदवी देऊन गौरविण्यात आले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेच्या ट्विटर अकाऊंटद्वारे किंग खानचा गौरव होतानाची छायाचित्रे ट्विट करण्यात आली होती. यावेळी मानद पदवीने गौरव झाल्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना किंग खान म्हणाला की, ‘मी खूप आनंदी आहे. आज माझी आई असती तर तीलासुद्धा या गोष्टीचा फार आनंद झाला असता. कारण, तिच्या जन्मस्थानी मला हा बहुमान मिळत आहे’.

मानद पदवी मिळण्याची ही किंग खानची पहिलीच वेळ नाहीये. याआधी शाहरुखला त्याच्या आजवरच्या कारकिर्दीसाठी विविध बहुमान मिळाले आहेत. शाहरुखने त्याच्या आजवरच्या बॉलिवूड सिनेमांच्या कारकिर्दीमध्ये अनेक सिनेमांतून विविध धाटणीच्या भूमिकांना न्याय देत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. त्यामुळे आपल्या लाडक्या अभिनेत्याचा मानद पदवीने गौरव होत असल्यामुळे शाहरुखच्या चाहत्यांमध्येही उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, १९९८ मध्ये स्थापना झालेल्या मौलाना आझाद राष्ट्रीय उर्दू विद्यापीठाद्वारे जवळपास २८८५ पदवीधर, पदव्युत्तर विद्यार्थ्यांना आणि इतर उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या पुरस्कार प्रदान सोहळ्यामध्ये गौरविण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2016 3:37 pm

Web Title: shah rukh khan and uday chopra had a twitter chat take out your dictionary
Next Stories
1 फोटोः तैमुरच्या जन्मानंतर सैफिनाची पहिली डिनर डेट
2 उत्तराखंडला गेलेल्या विराट-अनुष्काचा फोटो व्हायरल
3 ऐश्वर्या, आराध्या आणि अभिषेक निघाले दुबईच्या सफरीला
Just Now!
X