News Flash

शाहरुख स्वतःचाच करतोय पाठलाग!

'अब स्टार फॅन के पिछे भागेगा!'

बॉलीवूड अभिनेता शाहरुख खान सध्या त्याच्या आगामी ‘फॅन’ चित्रपटाची प्रसिद्धी करण्यात व्यस्त आहे. फॅन या चित्रपटात शाहरुखने सुपरस्टार आर्यन खन्ना आणि त्याचा चाहता गौरव या दुहेरी भूमिका साकारल्या आहेत.
नुकताचं शाहरुखने या चित्रपटातील एक फोटो ट्विट केला आहे. चित्रपटातील स्टार आर्यन हा त्याचा चाहता गौरवचा बाइकवरून यात पाठलाग करताना दिसतो. या फोटोसह शाहरुखने ट्विट केलेय, मला अपेक्षा आहे मी एक दिवस स्वतःलाच पकडेन.. किंवा नाही. पण मी प्रयत्न करत राहिन. ‘अब स्टार फॅन के पिछे भागेगा!’


यशराज बॅनरची निर्मिती असलेल्या ‘फॅन’ चित्रपटाचे दिग्दर्शन मनिष शर्मा याने केले आहे. १५ एप्रिलला ‘फॅन’ चित्रपट प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 15, 2016 1:21 pm

Web Title: shah rukh khan chases himself in the new still of fan ab star fan ke peeche
टॅग : Fan
Next Stories
1 व्हायरलः रणवीरचे पहिले ऑडिशन पाहून तुम्हीही हसाल
2 आलिया-रणवीरचा ‘मिस्ट्री प्रोजेक्ट’
3 सोनमसाठी ऐश्वर्याची गच्छंती
Just Now!
X