यश राज फिल्म्स बॅनरअंतर्गत तयार झालेला ‘सुई धागा’ हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट ‘मेक इन इंडिया’ या थीमवर आधारित असून यामध्ये अभिनेता वरुण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा प्रमुख भूमिकेत झळकणार आहेत. सध्या या चित्रपटाची संपूर्ण टीम चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त असून या टीमने #suidhaagachallenge हा नवा ट्रेंड सुरु केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुई धागाच्या टीमने सुरु केलेल्या #suidhaagachallenge या ट्रेंडमध्ये १० सेलिब्रेटी कलाकारांना नॉमिनेट केलं असून या कलाकारांनी १० सेकंदामध्ये सुईमध्ये दोरा ओवून दाखवायचा होता. यामध्ये अभिनेता शाहरुख खानच्या नावाचाही समावेश होता. विशेष म्हणजे शाहरुखने हे चॅलेंज स्वीकारलं असून ते अत्यंत चुटकीसरशी ते पूर्णदेखील केल्याचं पाहायला मिळालं.

अनुष्काने प्रथम हे चॅलेंज अक्षयकुमार, आलिया भट, आदित्य रॉय कपूर आणि रणवीर कपूर यांना दिलं होतं. मात्र त्यांच्याकडून हे चॅलेंज पूर्ण होऊ शकलं नाही. मात्र शाहरुख खानने अवघ्या काही सेकंदामध्ये हे चॅलेंज पूर्ण करुन दाखविलं त्यानंतर अनुष्काने शाहरुखला विजेता म्हणून घोषित केलं आहे.

दरम्यान, अनुष्का- वरुणचा हा चित्रपट २८ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होत असून चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून जोरदार प्रमोशन करण्यात येत आहे. या चित्रपटामध्ये वरुण एका कपडा व्यापारी दाखविण्यात आला आहे. तर अनुष्काने त्याच्या पत्नीची भूमिका पार पाडली आहे.

 

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shah rukh khan completes and won anushka sharmas sui dhaaga challenge
First published on: 20-09-2018 at 13:07 IST