25 September 2020

News Flash

शाहरूख खानने केले गौरीचे अभिनंदन

'बॉलिवूडचा बादशाह' शाहरूख खानची पत्नी गौरी खान लवकरच एक इंटेरिअर डिझाईन स्टोअर सुरू करत आहे.

| February 18, 2014 04:21 am

‘बॉलिवूडचा बादशाह’ शाहरूख खानची पत्नी गौरी खान लवकरच एक इंटेरिअर डिझाईन स्टोअर सुरू करत आहे. स्टोअर सुरू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून, मुंबईमध्ये सुरू होणाऱ्या या स्टोअरचे नाव ‘द डिझाईन सेल’ असे असणार आहे. गौरी सुरू करत असलेल्या या व्यवसायाला शाहरूखने शुभेच्छा देत तिचे अभिनंदन केले. याबाबत टि्वटरवर पोस्ट केलेल्या संदेशात शाहरूख म्हणतो, आधीपासूनच गौरी खानचे हृतिक रोशनची विभक्त पत्नी सुझानबरोबर भागिदारी स्वरुपातील दुकान आहे. परंतु, आता पतीच्या सहकार्याने आणि उत्तेजनेमुळे गौरी खानने तिच्या कलात्मकतेला आणखी पुढे नेत स्वतंत्रपणे व्यवसाय सुरू करण्याचे ठरवले आहे.शाहरूखलासुद्धा गृह सजावटीची आवड असून, त्यानेच आपल्याला या व्यवसायासाठी उत्तेजन दिल्याचे, गौरीने एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते. याशिवाय नुकत्याच पार पडलेल्या ‘व्हॅलेंटाइन-डे’च्या आठवणींना उजाळा देताना ती म्हणाली, व्हॅलेंटाईन दिनाच्या दिवशी मी कामात व्यस्त असल्यामुळे मला त्या दिवसाचा विसर पडला. परंतु, त्या दिवशी माझ्या दुकानाबाहेर फुलं, भेट वस्तू आणि एक नवी कोरी फॅन्सी मर्सिडीझ मला दिसली. माझ्यासाठी शाहरूखनं हे सर्व केल्याबद्दल त्याचं कौतुक कराव तेव्हढं थोड आहे.शाहरूख आणि गौरीचे अन्य जवळचे मित्र फराह खान आणि करण जोहर यांनी सुद्धा तिला नव्या व्यवसायासाठी टि्वटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 18, 2014 4:21 am

Web Title: shah rukh khan congratulates wife gauri on her new start
Next Stories
1 फर्स्ट लूक : ‘मि. एक्स’ इमरान हाश्मीचा भितीदायक अवतार
2 ‘ट्वेल्व्ह इयर्स अ स्लेव्ह’ ला दोन, तर ‘ग्रॅव्हिटी’ ला सहा पुरस्कार ब्रिटीश अकादमी चित्रपट पुरस्कार २०१४
3 पाहाः सोनम-आयुषमानचे ‘गुलछरे’
Just Now!
X