News Flash

शाहरुखने गाठला ६० लाखांचा टप्पा!

करोडो चाहत्यांचा आवडता अभिनेता आणि बॉलीवूडचा बादशाहा शाहरुखने ट्विटवर साठ लाख फोलोअर्सचा टप्पा गाठला आहे.

| December 3, 2013 12:13 pm

अभिनेता शाहरुख खान (संग्रहित छायाचित्र)

करोडो चाहत्यांचा आवडता अभिनेता आणि बॉलीवूडचा बादशाहा शाहरुखने ट्विटवर साठ लाख फोलोअर्सचा टप्पा गाठला आहे. “साठ लाख फोलोअर्ससाठी धन्यवाद. या आकड्यापेक्षाही आपले प्रेम वाढत जावो. गणना होणार नाही आणि मोजताही येणार नाही इतका तुम्हाला आनंद मिळो,” या शब्दांमध्ये चाहत्यांच्या प्रेमाने भारावलेल्या शाहरुखने ट्विट केले आहे.
SRK6Million,#6MillionSRKiansOnTwitterआणि #6millionssrkians हे तीन टॅग ट्विटरवर असून, शाहरुखच्या आनंदात सहभागी होण्यासाठी त्याचे चाहते यांचा वापर करू शकतात. शाहरुखने आमिर आणि सलमान या दोन्ही खान अभिनेत्यांना ट्विटरवर मागे टाकले आहे. यांच्या चाहत्यांची संख्याही लवकरच ५० लाखांवर होईल.
२३ नोव्हेंबरला अमिताभ यांच्या ट्विटर चाहत्यांची संख्या ७० लाखांहून अधिक झाली. त्यावेळी त्यांनी सलमान, आमिर आणि शाहरुख हेदेखील ७० लाखांहून अधिक चाहते असण्याचे पात्र आहेत, असे ट्विट केले होते. बीग बींची ही इच्छा पूर्ण होत आहे असे वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 3, 2013 12:13 pm

Web Title: shah rukh khan crosses 6 million followers on twitter
टॅग : Twitter
Next Stories
1 पाहाः ‘धूम ३’मधील आमिर आणि कतरिनाची अॅक्रोबॅट अॅक्ट तयारी
2 फ्रेडा पिंन्टो आणि नर्गिस फाखरीची ‘कॉफी विथ करण’ मध्ये धमाल मस्ती
3 शाहरूखच्या दुबईतील ‘लाईव्ह कॉन्सर्ट’मध्ये चाहत्यांचा गोंधळ
Just Now!
X