बी- टाऊन असो किंवा सोशल मीडिया, सतत चर्चेत राहणारी स्टार किड म्हणजे शाहरुख खानची मुलगी सुहाना खान. अवघ्या १८ व्या वर्षी सुहानाने स्वत:चा चाहतावर्ग तयार केला आहे. किंग खान इतकाच तिचाही स्टारडम पाहायला मिळतो. फॅशन सेन्स असो किंवा तिचा लूक सुहाना सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. शाहरुखची लेक सुहाना आता १८ वर्षांची झाली आहे. २२ मे २००० रोजी मुंबईत सुहानाचा जन्म झाला. तिच्या वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आई गौरी खानने सुहानाचा एक ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. तर अशा ग्लॅमरस सुहानाविषयी काही खास गोष्टी जाणून घेऊयात.. १. स्पोर्ट्समध्ये सुहानाला फार रस आहे. तिने शाळेत असताना बऱ्याच फूटबॉल स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि जिंकलीसुद्धा. फूटबॉलशिवाय तिला क्रिकेटचीही आवड आहे. शाहरुखसोबत तिला IPL सामन्यांमध्ये पाहिलं गेलं आहे. २. बॉलिवूडमध्ये पदार्पणासाठी सज्ज असलेली सुहाना तिच्या ड्रेसिंग सेन्ससाठी विशेष प्रसिद्ध आहे. तिच्या एकेक ड्रेसची किंमज जाणून तुम्हीही थक्क व्हाल. महागडे ड्रेस, टी- शर्ट्स, शूज तिला आकर्षित करतात, ज्यांची किंमत लाखोंमध्ये असते. ३. सुहाना सध्या लंडनमध्ये तिचं शिक्षण पूर्ण करत आहे. त्याआधी तिने मुंबईतल्या धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं. ४. पॉप सिंगर जेन मलिकची ती खूप मोठी चाहती आहे. ५. फारच कमी लोकांना माहित आहे की सुहानाचं लिखाण खूप छान आहे. राष्ट्रीय स्तराच्या स्पर्धेत तिला लिखाणासाठी पुरस्कारदेखील मिळाला आहे.