News Flash

..म्हणूनच सुहानाचा ‘हा’ फोटो होतोय इतका व्हायरल

सुहाना जेथे जाईल तिथं तिला चाहते स्पॉट करत असतात.

सुहाना खान

बॉलिवूडचा ‘बादशहा’ असा टॅग घेऊन फिरणारा अभिनेता शाहरुख खान याने अनेक वर्ष अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. त्याच्याच पावलावर पाऊल ठेवत त्याची लेक सुहानादेखील हळूहळू प्रेक्षकांच्या मनावर भुरळ घालत असल्याचं पाहायला मिळत आहे. सुहाना जेथे जाईल तिथं तिला चाहते स्पॉट करत असतात. त्यामुळे तिचा प्रत्येक फोटो किंवा व्हिडिओ वाऱ्यासारखा व्हायरल होत असतो. सध्या सुहानाचा असाच एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या फोटोत ती ग्लॅमरस अंदाजात दिसून येत आहे.

सुहाना सध्या लंडनमध्ये शिकत असून ती अनेक वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असते. असाच एक फोटो सुहानाने शेअर केला असून या फोटोमध्ये तीने प्लाजो आणि क्रॉप टॉप घातला आहे. तसंच त्यावर शोभेल असं स्नीकर्स आणि सनग्लासेस देखील घातल्यामुळे ती आणखीनच उठून दिसत आहे.

Love u so much baby girl #suhanakhan

A post shared by suhana khan (suhanians) (@suhanakhan__fb) on

कायम आपल्या फॅशनसेन्सकडे जाणीवपूर्वक लक्ष देणाऱ्या सुहानाच्या प्रत्येक फोटोमधून तिचा आत्मविश्वास झळकत असतो. विशेष म्हणजे स्टारकिडमध्ये सुहाना कायम ड्रेसिंग सेन्स आणि स्टाईल स्टेटमेंटमध्ये बाजी मारुन नेत असल्याचं दिसून येतं

दरम्यान, हा फोट व्हायरल होत असतानाच काही दिवसापूर्वी सुहानाने ‘वोग’ या मासिकाच्या कव्हरफोटोसाठी फोटोशूट केलं आहे. यावेळी तिने यातील काही फोटोदेखील शेअर केले होते. विशेष म्हणजे सुहाना २०२० पर्यंत बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र सुहानाचं शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार नाही असं शाहरुखने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2018 9:37 am

Web Title: shah rukh khan daughter suhana khan picture viral
Next Stories
1 गोव्याचा मस्त किनारा आणि ते रुप बदलणारे दोघे…
2 फ्लॅशबॅक : यश जोहर आणि देव आनंद
3 करमणूक की फसवणूक?
Just Now!
X